एक्स्प्लोर

ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना नो टेन्शन !

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म न झाल्यास अनेकदा त्रास वाढतो. यावर रेल्वे मंत्रालयाने नामी उपाय शोधला आहे. ‘विकल्प’ नामक योजना रेल्वे मंत्रालयाने आणली आहे. या योजनेनुसार आता कन्फर्म तिकीट नसलं, तरी काळजी करण्याचं कारण्याचं कारण उरणार नाही. विकल्प योजना काय आहे? मेल किंवा एक्स्प्रेसचं तिकीट काढल्यानंतरही वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्यांसाठी विकल्प योजना आहे. या योजनेनुसार, वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा असल्यास, त्या ट्रेनचं कन्फर्म तिकीट दिलं जाईल. म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये असल्याने वाढणारी धाकधूक कमी होण्यास मदत होईल. उदाहरणार्थ - जर तुमचं तिकीट ‘तुफान’ एक्स्प्रेसचं आहे आणि तुमचं तिकीट कन्फर्म झालं नाही. तर त्याच मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीट रिकामी असल्यास, तिथे तुम्हाला कन्फर्म तिकीट दिलं जाईल. विकल्प निवडणं बंधनकारक एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेनुसार, सुरुवातील ज्या ट्रेनचं तिकीट बुक करत असाल, त्यावेळी ‘विकल्प’ निवडणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला कन्फर्म तिकीट न मिळाल्यास, पर्याय निवडलेल्या ट्रेनची कन्फर्म तिकीट मिळू शकेल. अतिरिक्त शुल्क नाही ! विशेष म्हणजे यासाठी कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही. मात्र, तुमच्या मूळ तिकिटाच्या रकमेहून कमी रकमेचं तिकीट असलेल्या ट्रेनमध्ये जागा मिळाल्यास, उर्वरित रक्कम परत मिळणार नाही. म्हणजेच अतिरिक्त शुल्कही नाही आणि रक्कम उरल्यास रिफंडची सुविधाही नाही. ‘विकल्प’ योजनेची सुरुवात 1 एप्रिलपासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. आतापर्यंत केवळ दिल्ली ते लखनौ, दिल्ली ते जम्मू, दिल्ली ते चेन्नई, दिल्ली ते हावडा या मार्गावरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. वेगवेगळ्या कारणांमुळे तिकीट रद्द केल्याने वर्षभरात जवळपास 7 हजार 500 कोटी रुपये रेल्वेकडून प्रवाशांना परत द्यावे लागतात. त्यामुळे ‘विकल्प’ योजनेमुळे यात फरक पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून विकल्प योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, ती केवळ सहा मार्गावरच होती. आता देशभर लागू करण्यात आली असून, ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्येही योजना सुरु केली आहे. येत्या काही दिवसात तिकीट खिडकीवरही विकल्प योजना सुरु करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget