एक्स्प्लोर

Indian Railway | रेल्वेकडून प्रवाशांना मोठा दिलासा, रद्द ट्रेनच्या तिकीटांचं रिफंड मिळण्याचा कालावधी वाढवला

कोरोना काळातील 21 मार्च ते 30 जून या दरम्यानच्या रद्द झालेल्या नियमित गाड्यांच्या तिकीटाचे पैसे प्रवाशांना परत मिळवण्यासाठीच्या कालावधीत वाढ करुन तो आता सहा महिन्यावरुन नऊ महिने करण्यात आला असल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळातील रद्द झालेल्या नियमित गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत घेण्याचा सहा महिन्याचा कालावधी वाढवून तो आता नऊ महिने इतका करण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मागील वर्षी कोरोना काळातील 21 मार्च ते 30 जून या दरम्यानच्या गाड्या रद्द केल्या होत्या. आता त्या संबंधी बुकिंगचे पैसे रिफंड करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना त्यांच्या बुकिंगचे पैसे मिळवण्यासाठी अधिकचा वेळ मिळू शकतो.

जगातील पहिली डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन सुरु, मोदी म्हणाले- येणारा काळ वैभवशाली असेल

हजारो प्रवाशांचे तिकीट अजूनही कॅन्सल नाही मंत्रालयाने सांगितले की, लॉकडाऊनच्या आधी तिकीटाचे बुकिंग केल्याच्या तारखेपासून पुढच्या नऊ महिन्यापर्यंत ते तिकीट रद्द करता येऊ शकेल आणि त्याचा परतावा मिळू शकेल. या आधी सहा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर काही प्रवाशांनी आपल्याला रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकीटांचे पैसे परत मिळावे अशी मागणी केली होती. त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लावल्यानंतर सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या संबंधीचे तिकीट रद्द करण्यासाठीचा कालावधी तीन दिवसांवरुन तीन महिने इतका करण्यात आला होता. मे महिन्यात या कालावधीत वाढ होऊन तो सहा महिने करण्यात आला. काऊंटरवर तिकीट रद्द करण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेता हा कालावधी वाढवण्यात आला होता. हा सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी अजून हजारो प्रवाशांचे तिकीट रद्द होऊ शकले नाही. त्यामुळे आता पुन्हा या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली 1.5 किमी लांबीची स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन आहे तरी कशी?

नऊ तारखेला साडे तीन तास आरक्षण बंद नऊ जानेवारीच्या मध्यरात्री रेल्वेच्या आरक्षणाची सेवा आणि चौकशीची सेवा साडेतीन तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. उत्तर रेल्वे मुख्यालय आपल्या दिल्लीतील पॅसेन्जर रिझर्वेशन सिस्टिम अपग्रेड करणार असल्याने नऊ तारखेला रात्री 11.45 पासून 3.15 पर्यंत पीआरएस संबंधी सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे या काळात रेल्वे आरक्षण करता येऊ शकणार नाही. त्याचसोबत रेल्वेची चार्टिंग आणि 139 नंबरची चौकशी सेवा बंद राहणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरील ई-तिकीटांची सेवाही बंद राहणार आहे.

आजपासून रेल्वे तिकीटांचं सुपरफास्ट बुकिंग, एका मिनिटात 10 हजार तिकीटांचं बुकिंग शक्य

खेळाडूंना रेल्वेच्या तिकीटात सूट द्यावी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी खेळाडूंना रेल्वेच्या प्रवासासाठी तिकीटाच्या रकमेत सूट मिळावी अशी मागणी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे. किरण रिजिजू यांनी यासंबंधी रेल्वे मंत्रालयाला एक पत्र पाठवलं आहे.

पहा व्हिडीओ: Indian Railway | कोरोना काळात रद्द ट्रेन तिकीटांचं रिफंड मिळवण्यासाठी आता 6 ऐवजी 9 महिन्यांची मुदत

आता Whatsapp वर पाहता येणार PNR स्टेटस, भारतीय रेल्वेकडून सुविधा उपलब्ध

महत्त्वाच्या बातम्या

Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget