जगातील पहिली डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन सुरु, मोदी म्हणाले- येणारा काळ वैभवशाली असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून Western Dedicated Freight Corridor च्या रेवाडी-मदार (Rewari-Madar) महामार्ग तसेच 1.5 किमी लांबीच्या जगातील पहिल्या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील (WDFC) 306 किमी लांबीच्या रेवाडी- मदार महामार्गाचे उद्घाटन केलं. तसेच विजेवर चालणाऱ्या 1.5 किमी लांबीच्या जगातील सर्वात पहिल्या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. येणारा काळ हा वैभवशाली असेल अशी आशा मोदींनी व्यक्त केली.
या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, " न्यू अटेली ते न्यू किशनगड या दरम्यान सुरु झालेल्या 1.5 किमी लांबीच्या या ट्रेनच्या सुरुवातीने भारत आता जगातील काही मोजक्याच प्रगत देशांच्या पंक्तीत बसला आहे. आजच्या दिवशी एनसीआर, हरियाणा आणि राजस्थानच्या शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मग ते पूर्व असो वा पश्चिम, केवळ मालगाड्यांना आधुनिक मार्गाची सुविधा उपलब्ध करुन देत नाहीत तर ते देशाच्या गतीशील विकासाचे कॉरिडॉर आहेत."
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हे असे मार्ग आहेत ज्यावर केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्या धावतील. या आधी मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या या एकाच मार्गावरुन धावायच्या. त्यामुळे मालवाहतूकीच्या गाड्यांना वाहतूकीसाठी बराच वेळ लागायचा. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे हा मालवाहतूकीच्या गाड्यांचा वाहतूक वेळ कमी झाला असून त्याचा परिणाम थेट विकासावर होत असल्याचं दिसून येतंय.
'पीएम केअर्स' फंडमधून देशभरात ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी 201 कोटींचा निधी
गेल्या काही वर्षात रेल्वेला गती मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या आधी रेल्वेच्या टिकीट बुकिंगपासून प्रवास संपेपर्यंत तक्रारीचा डोंगर उभा रहायचा. स्वच्छता, वेळेवर गाड्या सोडणे, सुरक्षा या सारख्या अनेक मागण्या प्रवासी सातत्याने करायचे. प्रवाशांच्या या मागण्या गेल्या काही वर्षात पूर्ण होत आहेत. आज भारतातील पायाभूत सुविधांचे काम दोन मार्गांवरुन सुरु आहे. एक मार्ग हा व्यक्तिगत विकासाला चालना देत आहे तर दुसरा मार्ग हा देशाच्या विकासाच्या इंजिनाला नवी उर्जा देतोय."
शेतकरी आणि शेती क्षेत्रावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "देशाच्या पायाभूत सुविधेला आधुनिक बनवण्यासाठी सुरु असलेल्या महायज्ञाने आता एक नवी गती प्राप्त केली आहे. गेल्या काही दिवसात आधुनिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार