Indian Railways : खराब हवामान आणि धुक्यामुळे 376 रेल्वेगाड्या रद्द, कुठे पाहाल रद्द गाड्यांची यादी?
आज (14 फेब्रुवारी) भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. खराब हवामान आणि धुक्यामुळे या गाड्या रद्द केल्या आहेत.
IRCTC Railway Train Cancelled : खराब हवामान आणि धुक्यामुळे भारतीय रेल्वेला (Indian Railway) पुन्हा एकदा अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. आज (14 फेब्रुवारी) भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही ट्रेनने प्रवास करणार असाल तर आधी तुमची ट्रेन रद्द झाली आहे की नाही हे पहावं लागेल. कारण आज भारतीय रेल्वेने 376 गाड्या रद्द केल्या आहेत. तर 5 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. यासोबतच 11 गाड्या अन्य मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
रद्द केलेल्या गाड्यांची कुठे पाहाल
तुम्हाला आज रेल्वेने कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत, हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES अॅपवर माहिती मिळेल. जिथे तुम्हाला तुमचा ट्रेन नंबर टाकूनच संपूर्ण माहिती मिळेल. त्याचवेळी, आपण पूर्ण किंवा अंशतः रद्द केलेल्या गाड्यांची यादी देखील पाहू शकता.
अशी पाहा रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण यादी
सर्वप्रथम enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट द्या. आता तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या पॅनलवर Exceptional Trains लिहिलेले दिसेल. जिथे तुम्हाला क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर तुमच्याकडे अनेक पर्याय असतील, त्यापैकी एक रद्द केलेल्या गाड्यांचा पर्याय असेल, जर तुम्हाला रद्द झालेल्या गाड्यांची यादी पहायची असेल, तर त्यावर क्लिक करा. गाड्यांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी, पूर्ण किंवा आंशिक पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.
यानंतर, रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार माहिती मिळू शकेल. हे लक्षात ठेवा की रद्द करणे, रीशेड्यूल आणि मार्ग बदलाशी संबंधित माहिती सतत अपडेट केली जाते. त्यामुळे हा नंबर देखील बदलू शकतो. त्यामुळे योग्य आणि अचूक माहितीसाठी वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- कुडाळमध्ये राणेंची प्रतिष्ठा पणाला; नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपचा सामना
- SBI on ABG Shipyard issue : एबीजी शिपयार्डविरुद्ध तक्रारी दाखल करण्यास विलंब नाही, एसबीआयचं स्पष्टीकरण