एक्स्प्लोर

Cyclone Michaung Update : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे प्रवाशांचे हाल! 144 ट्रेन रद्द; चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा बंद

Indian Railway News : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळत आहे. याचा परिणाम रेल्वेवरही झाला असून अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

Cyclone Michaung Update : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे देशभरात अवकाळी पावसाची हजेरी (Rain Updates) पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ वेगाने (Cyclone Update) आंध्र प्रदेश आणि ओडिसा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. चक्रीवादळाचा परिणाम (Cyclone Michaung Update) भारतीय रेल्वेवरही (Indian Railway) झाला असून 144 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक ट्रेनचा मार्घ बदलण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी

चक्रीवादळामुळे चेन्नई, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशसह आसपासच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. चेन्नई, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 

चक्रीवादळामुळे 144 गाड्या रद्द

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉन्ग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झारखंडमधून धावणाऱ्या सुमारे 10 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच बिहार, बंगाल, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व रेल्वे विभागातील अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. बरौनी-कोइम्बतूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ट्रेन, कोईम्बतूर-बरौनी साप्ताहिक एक्सप्रेस विशेष रेल्वे, धनबाद अल्लापुझा एक्सप्रेस ट्रेन आणि रांची मार्गे धावणारी अल्लापुझा धनबाद एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आली आहे. याशिवाय हटिया-सर एम विश्वेश्वरय्या बेंगळुरू एक्स्प्रेस ट्रेनही रद्द करण्यात आली आहे.

'या' भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि चेन्नईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 90 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या राज्यांतील परिस्थितीची माहिती घेत तयारीचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवामान खात्याने आज उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ 'मिचॉन्ग' तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ पोहोचलं आहे. या काळात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान मिचॉन्ग चक्रीवादळ धडकण्याची भीती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुद्दुचेरी, कराईकल आणि यानम भागात 4 डिसेंबरला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तामिळनाडू, चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफ टीमला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. येथे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांनी पेरंगलाथूर जवळील पीरकंकरनई आणि तांबरम भागातील सुमारे 15 लोकांना शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे वाचवले.

महत्त्वाच्या बातम्या

Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget