एक्स्प्लोर
अफगाणिस्तानवरील अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात भारतीय युवक ठार?
नवी दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तानावर केलेल्या सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ल्यात भारतीय युवक ठार झाल्याचं वृत्त आहे. केरळातील 23 वर्षीय टीके मुर्शिद मोहम्मदचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भारतीय नागरिक असलेला मुर्शिद आयसीसमध्ये सहभागी झाल्याचा आरोप आहे.
'तुमचा मुलगा 'शहीद' झाला आहे, तुम्ही अभिमान बाळगा' असा संदेश अफगाणिस्तानातून मुर्शिदच्या पालकांना मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुर्शिदचे वडील केरळच्या उत्तरेकडी कासारगोडे भागातल्या पाडन्ना गावात राहतात. टेलिग्राम या सोशल अॅपवर हा मेसेज पाठवण्यात आला.
टेलिग्राम हे व्हॉट्सअॅपप्रमाणे असलेलं सोशल मेसेजिंग अॅप आयसिसच्या दहशतवाद्यांकडून वापरलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे मेसेज 24 तासांनी नाहीसे होतात. हा मेसेज मुर्शिदच्या वडिलांनी पोलिसांना दाखवल्याचं म्हटलं जातं, मात्र त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
पदवीधर असेलला मुर्शिद बंगळुरुमध्ये सीए होण्यासाठी अभ्यास करत होता. अबुधाबीमध्ये वडिलांना व्यवसायात मदत करण्यासाठी तो गेला. 3 जूनला त्याने आईला फोन करुन आपण परत येत असल्याचं सांगितलं, मात्र तो परत आला नाही. मुंबई किंवा दुबईतील इतर संशयितांसोबत तो आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा कुटुंबीयांना संशय होता.
दोन महिन्यांपूर्वी केरळातील 24 वर्षीय हफिझुद्दीनचा अफगाणिस्तानातील ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. केरळातील तीन मुलं आणि चार महिलांसह 21 जण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचं म्हटलं जातं. यापैकी अनेक जण उच्चशिक्षित असून उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.
अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या सर्वात मोठ्या नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ल्याची तीव्रता हळूहळू जगासमोर येऊ लागली आहे. या हल्ल्यात आयसिसच्या 36 अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अमेरिकेने गुरुवारी संध्याकाळी 7 वा. अफगाणिस्तानवर सर्वात मोठा नॉन-न्यूक्लियर बॉम्ब हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.
आयसीसचा सुळसुळाट असलेल्या भागात अमेरिकेने हल्ला केला. MOAB (Mother Of All Bombs) हा जगातील सर्वात शक्तिशाली अण्वस्त्र विरहीत बॉम्ब अमेरिकेने वापरला आहे.
आयसिसच्या 7 हजार दहशतावादी तळांवर अमेरिकेनं जगातील सर्वात मोठा बिगर आण्विक बॉम्ब जीबीयू 43 ने अफगाणिस्तानवर हल्ला केला. तब्बल 11 हजार किलोंचा हा बॉम्ब आहे.
या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’ संबोधलं जातं.
ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण पाकिस्तानच्या पेशावरपासून 100 किमी अंतरावर आहे. यामध्ये शेकडो जणांचा जीव गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा बॉम्ब सामान्य लढाऊ विमानाद्वारे टाकला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे मालवाहू एमसी-130 विमानाने तो टाकला.
विशेष म्हणजे भारतातील आयसीसची वाढती पाळंमुळं हा चिंतेचा विषय असताना भारतासाठी हा बॉम्बहल्ला अतिशय महत्वाचा आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आपण अध्यक्ष झालो तर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांवर सर्वात मोठा बॉम्ब टाकू हे डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडणूक प्रचारातील वाक्य त्यांनी खरं करुन दाखवलं.
संबंधित बातम्या
अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात आयसिसचे 36 अतिरेकी ठार
GBU-43 –अफगाणिस्तानवर टाकलेल्या बॉम्बची किंमत किती?
अमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तिशाली बॉम्ब हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement