एक्स्प्लोर

पाकमधील भारतीय उच्चायुक्तांना पाक परराष्ट्र मंत्रालयाचं बोलावणं

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानातही हालाचालींना वेग आला आहे. पाकिस्तानातील भारतीय राजदूतांना पाकच्या परराष्ट्र मंत्रालयानं बोलावणं धाडलं आहे. पाकमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलावलं आहे. भारतीय लष्कराच्या कारवाईवर उच्चायुक्तांना एक प्रकारची कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचं म्हटलं जातं. पाकिस्तान सरकारवर पाक लष्कराचा वरचष्मा असल्याचं अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषाही एकीकडे लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याकडून बोलली जात आहे. त्यामुळे पाक काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला.  भारतीय लष्कराच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली. कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले. इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं. “घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही”, असं रणबीर सिंह म्हणाले. यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं. तसंच या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती लष्कराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती, जम्मून काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिली होती, असं रणबीर सिंह यांनी सांगितलं. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये  सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये  निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक… थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. गावाकडच्या भाषेत घुसून मारणं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय. साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होत असते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget