एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानला वाहून जाणारं पाणी भारतातील नद्यांकडे वळवणार, केंद्राचा निर्णय
पाकिस्तानला वाहून जाणारं पाणी पूर्ववाहिनी नद्यांना जोडून जम्मू काश्मिर आणि पंजाबच्या रहिवाशांना दिलं जाणार असल्याचं नितीन गडकरींनी ट्विटरवरुन सांगितलं.
नवी दिल्ली : भारतातून पाकिस्तानला वाहून जाणारं भारताच्या वाट्याचं पाणी रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पाकिस्तानला वाहून जाणारं पाणी पूर्ववाहिनी नद्यांना जोडून जम्मू काश्मिर आणि पंजाबच्या रहिवाशांना दिलं जाणार असल्याचं गडकरींनी ट्विटरवरुन सांगितलं.
रावी नदीवर शाहपूर-कानडीचं बांधकाम सुरु झालं आहे. हे सर्व राष्ट्रीय प्रकल्प असल्याचंही गडकरींनी सांगितलं.Under the leadership of Hon'ble PM Sri @narendramodi ji, Our Govt. has decided to stop our share of water which used to flow to Pakistan. We will divert water from Eastern rivers and supply it to our people in Jammu and Kashmir and Punjab.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 21, 2019
The construction of dam has started at Shahpur- Kandi on Ravi river. Moreover, UJH project will store our share of water for use in J&K and the balance water will flow from 2nd Ravi-BEAS Link to provide water to other basin states.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 21, 2019
1960 साली विश्व बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या सिंधू जल करारानुसार चिनाब (बियास), सतलज आणि रावी या पूर्ववाहिनी नद्यांचं नियंत्रण भारताकडे, तर सिंधू, चिनाब (चंद्रभागा) आणि झेलम या पश्चिमवाहिनी नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये अद्याप जलयुद्ध झालेलं नाही. झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि सिंधू या पाच नद्या पाकिस्तानात वाहतात. झेलम नदी 774 किलोमीटर लांब असून ती चिनाबची उपनदी आहे. झेलमचा उगम काश्मिरमध्ये होत असून ती श्रीनगर मार्गे पाकिस्तानात वाहत जाते.All the above Projects are declared as the National projects.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement