Indian Army Dasara 2023 : भारत-चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन, जवानांसोबत विजयादशमी साजरी
Indian Army Dasara Celebrations : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तवांग येथील भारत-चीन सीमेवर भारतीय सैन्य दलाच्या जवानांसोबत विजयादशमी साजरी केली.
Indian Army Vijaya Dashmi Celebrations : दसऱ्याच्या (Dussehra) शुभ मुहूर्तावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या हस्ते भारत-चीन सीमा (India-China Border) वर शस्त्रपूजन करण्यात आलं. भारताचे संरक्षण मंत्री (Minister of Defence of India) राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात सैन्य दलासोबत दसरा विजयादशमी (Defence Minister Rajnath Singh) साजरी केली. तवांग येथील भारत-चीन सीमेवर राजनाथ सिंह यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं.
चीन सीमेवर संरक्षण मंत्र्यांकडून शस्त्रपूजन
शस्त्रपूजनाचा व्हिडीओ ट्विटर एक्सवर शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, 'विजयादशमीच्या पवित्र दिवशी तवांगमध्ये शस्त्रपूजा'. जवानांना संबोधन करताना संरक्षण मंत्र्यांनी जवानांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, मी आजच्याच दिवशी 4 वर्षांपूर्वी येथे आलो होतो, मला वाटले की मी तुमच्यासोबत विजयादशमी साजरी करावी. ज्या कठीण परिस्थितीत तुम्ही देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेता त्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो.
जवानांसोबत विजयादशमी साजरी
#WATCH | Defence Minister Rajnath Singh performs Shashtra Puja at Tawang, Arunachal Pradesh on #VijayaDashami #Dussehra pic.twitter.com/ZXX6nCBEQQ
— ANI (@ANI) October 24, 2023
राजनाथ सिंह यांचा सैनिकांशी संवाद
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, बहुतेक सैनिकांना एकदा सैन्यात सेवा करण्याची इच्छा असते. टेरिटोरियल आर्मीच्या माध्यमातून लष्कराचा गणवेश आपल्या अंगावर यावा, अशी राजकारणातील नेत्यांचीही इच्छा असते. देशातील नागरिकांना या गणवेशाचे महत्त्व माहित आहे. देशाच्या नागरिकांना सैनिकांप्रती आदर आहे.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh interacts with Army personnel deployed in service of the nation at the India-China border at Bum La, Arunachal Pradesh pic.twitter.com/sokuCC9c63
— ANI (@ANI) October 24, 2023
चिनी सीमेवरील चौक्यांचं निरीक्षण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशातील बमला येथून सीमेच्या पलीकडे असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचं निरीक्षण केलं. अरुणाचल प्रदेशातील बमला येथे भारत-चीन सीमेवर देशाच्या सेवेत तैनात असलेल्या लष्करी जवानांशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला.
जगासमोर भारताचा दर्जा उंचावला
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "तुम्ही सीमा सुरक्षित ठेवल्या आहेत आणि त्यामुळेच जगासमोर भारताचा दर्जा झपाट्याने वाढत आहे. गेल्या 8 ते 9 वर्षांत भारताचा दर्जा उंचावला आहे, हे वास्तव सर्व विकसित देशांनी स्वीकारले आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा दर्जा उंचावला आहे, भारताने आर्थिक विकास केला आहे, हे खरंच महत्त्वाचं आहे, पण तुम्ही देशाची सीमा सुरक्षित ठेवली नसती तर, हे शक्यच झालं नसतं."