एक्स्प्लोर

Cheetah Helicopter Crash: अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं, दोन्ही पायलट बेपत्ता

Indian Army Helicopter Crashed:  अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter) कोसळलं आहे. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिक बेपत्ता आहेत.

Indian Army Helicopter Crashed:  अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter Crashed) कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमधील दोन्ही लष्करी पायलट बेपत्ता आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरु आहे. आज सकाळी बोमडिलाजवळ ही घटना घडली आहे. अद्याप अपघाताचे नेमकं कारण समजले नाही. 

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने मिसामारीच्या दिशेने निघाले होते. अपघात झाला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि को-पायलट होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (Lt. Col. Mahendra Rawat) यांनी सांगितले की, ऑपरेशन सॉर्टीसाठी चित्ता हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. सकाळी 9.15 च्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (एटीसी) संपर्क तुटला.  

ऑक्टोबर महिन्यात देखील झाला होता अपघात

ऑक्टोबर महिन्यात अरुणाचल प्रदेशमधील तवांग जवळ भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर 'चित्ता'चा अपघात झाला होता. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला होता. तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू या ठिकाणी अपघात झाला होता. चित्ता हेलिकॉप्टर सुरवा सांबा भागातून टेहळणीसाठी या भागात येत होते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाला होता. 

भारताबाहेर परदेशातही चित्ता हेलिकॉप्टरचा वापर

'चित्ता' हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या ताफ्यात 1976 मध्ये दाखल झाले होते. हे 'चित्ता' हेलिकॉप्टर प्रवास, निरीक्षण, पाळत ठेवणे, लॉजिस्टिक, मदत आणि बचाव कार्यासाठी होतो. उंचावरील मोहिमेसाठी हे 'चित्ता' हेलिकॉप्टर उपयोगी आहे. चित्ता हेलिकॉप्टरमध्ये Artouste - III B turbo shaft इंजिन आहे. हिंदुस्तान एअरोनॉक्स लिमिटेडने (Hindustan Aeronautics Limited) याची निर्मिती केली आहे. HAL ने जवळपास 250 हून चित्ता हेलिकॉप्टरची निर्मिती आणि विक्री केली आहे. भारताबाहेर परदेशातही या हेलिकॉप्टरचा वापर होतो. या विमानात दोन पायलट आणि तीन प्रवासी बसू शकतात. 

पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश

गेल्या पाच वर्षात 15 हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ही माहिती 17 डिसेंबरला लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्य संरक्षणमंत्री अजय भट्ट यांनी दिली, 2017 ते 2021 या कालावधीत तब्बल 15 दुर्घटना झाल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Satara News : सातारा जिल्ह्यातील 'त्या' जवानाची आत्महत्या नव्हे हत्याच, आर्मी कॅम्पमधील जवानाने घातली गोळी; वडिलांच्या सातारा ते जम्मू लढ्याला यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget