गर्भवती असतानाही युद्धात उतरुन पाकिस्तानच्या छाताडावर बंदूक रोखणारी रणरागिणी; कारगिल युद्धातील यशिका त्यागींची थक्क करणारी कहाणी!
Captain Yashika Tyagi : भारतीय लष्कराच्या कॅप्टन यशिका त्यागी यांनी गरोदरपणात कारगिल युद्ध लढले होते. जाणून घ्या त्यांची थक्क करणारी कहाणी...

Captain Yashika Tyagi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा आक्रमक दृष्टिकोन पाहून पाकिस्तान पुन्हा एकदा गुडघे टेकला आहे. पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्याला भारताने देखील सहमती दर्शवली आहे. तथापि, गेल्या काही दिवसांतील घटनांवर नजर टाकली तर भारताने जलद हवाई हल्ले करून हे स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे पाकिस्तानचा नकाशा कधीही बदलण्याची ताकद आहे. पण भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे पाकिस्तानने झुकण्याची ही पहिलीच वेळ नाही.
पाकिस्तानने यापूर्वी चार वेळा भारताशी युद्ध केले आहे आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सर्व युद्धांपैकी सर्वात धोकादायक युद्ध म्हणजे कारगिल युद्ध, जे सुमारे तीन महिने चालले होते. या काळात भारताच्या शूर सैनिकांनी केवळ पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले नाही तर जगाला त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली होती.
जर आपण सध्याच्या काळाकडे पाहिले तर भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाची लष्करी शक्ती आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला भारताच्या शूर महिला सैनिकाबाबत सांगत आहोत, जिने तिच्या गरोदरपणातही कारगिल युद्धात पाकिस्तानशी युद्ध लढले होते.
कॅप्टन यशिका त्यागी गरोदरपणात लढल्या युद्ध
निवृत्त कॅप्टन यशिका त्यागी यांनी गरोदरपणात कारगिल युद्ध लढले होते. एका पॉडकास्टमध्ये यशिका त्यागी यांनी सांगितले आहे की, जेव्हा त्या कारगिल युद्धात लढायला गेल्या, तेव्हा त्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत होत्या. तिच्यासोबत तिचे दोन वर्षांचे बाळ देखील होते. त्यांनी आपल्या कमांडिंग ऑफिसरकडे आपल्या मुलाला सोबत ठेवण्याची परवानगी मागितली होती, आणि त्यांनी ती मंजूर केली. "मी दोन वर्षाच्या मुलासोबत, हातात बंदूक घेतलेली होती आणि त्याचवेळी मी गरोदरही होते," असे त्यांनी सांगितले.
निवृत्त कॅप्टन यशिका पुढे म्हणाल्या की, "या सगळ्या गोष्टी लोकांना समजत नाहीत, पण हीच खरी इंडियन आर्मी आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा मोठ्या संख्येने आपले जवान शहीद होत होते. अशा परिस्थितीत ऑर्डर आली की, 50 शवपेट्या आगाऊ तयार ठेवाव्यात. पण आपल्या जवानांनी ठामपणे सांगितले की, आम्ही आपल्या भावांसाठी आधीच शवपेट्या बनवू शकत नाही. जर गरज भासलीच, तर आम्ही अर्ध्या तासात शवपेट्या तयार करू, असेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा























