IAF C-17 Globemaster: लेह विमानतळाच्या रनवेवर वायुसेनेचं सी-17 ग्लोबमास्टर विमान ठप्प; उड्डाणं रद्द, प्रवाशांचे हाल
C-17 Globemaster Stuck At Leh Runway: मंगळवारी (16 मे) भारतीय हवाई दलाचं C-17 ग्लोबमास्टर विमान लडाखमधील लेह विमानतळावर काही तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीवर अडकलं.
C-17 Globemaster Stuck At Leh Runway: भारतीय हवाई दलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान मंगळवारी (16 मे) काही तांत्रिक बिघाडामुळे लेह विमानतळाच्या धावपट्टीवर अडकलं. त्यामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, सी-17 हेवी लिफ्ट वाहतूक विमान सेवाक्षमतेच्या समस्यांना तोंड देत आहे आणि लेहमधील धावपट्टीवर आहे. समस्या सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ते म्हणाले की, आज (17 मे) सकाळपर्यंत रनवे इतर उड्डाणासाठी उपलब्ध होईल.
एएनआयनं भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं माहिती दिली की, हवाई दलाचे सी-17 ग्लोबमास्टर विमान लेहच्या धावपट्टीवर अडकले आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सी-17 ग्लोबमास्टरमुळे रनवे ब्लॉक झाला आणि त्यामुळे येथे विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग करता आलं नाही.
A C-17 heavy-lift transport aircraft is facing serviceability issues and is on the runway at Leh. The issue is in the process of being rectified and the runway is expected to be made available for flying by tomorrow morning: IAF officials pic.twitter.com/JfBveiCqjO
— ANI (@ANI) May 16, 2023
सी-17 ग्लोबमास्टर विमानामुळे रनवे ब्लॉक
कुशोक बकुला रिनपोछे विमानतळावर C-17 ग्लोबमास्टर विमानामुळे, रनवे संपूर्ण दिवस ब्लॉक करण्यात आला आहे आणि या काळात कोणतंही टेक ऑफ किंवा लँडिंग होऊ शकलं नाही. त्यामुळे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मंगळवारी लेह विमानतळाच्या वतीनं ट्वीट करून माहिती देण्यात आली की, "विमानतळावरील जवळपास सर्व उड्डाणं आज रद्द करण्यात आली आहेत." संबंधित एजन्सी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि 17 मे पर्यंत वेळापत्रकानुसार उड्डाणं सुरळीत करण्यासाठी काम करत आहेत. वेळोवेळी परिस्थितीनुसार पुढील अपडेट्स शेअर केले जातील."
Julley !!!
— Leh Airport (@LehAirport) May 16, 2023
Due to some avoidable circumstances, today almost all flights were cancelled from IXL.
Concerned agencies are continuously working on it to rectify the aforesaid circumstance and to make flights operational by tomorrow as per schedule.
Further updates will be shared.
ट्विटरवर प्रवाशांचा संताप
काही प्रवाशांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या समस्या सांगितल्या आहेत. एअर इंडियाला टॅग करत एका यूजरनं लिहिलं आहे की, "16 मे रोजी माझं लेह ते चंदीगडचं फ्लाइट रनवेवरील IAF च्या तांत्रिक समस्येमुळं रद्द करण्यात आलं. विमानतळावर मला सांगण्यात आलं की, आज अतिरिक्त फ्लाइट उपलब्ध करून दिली जाईल. आता कस्टमर केयर सांगत आहे की, 23 मेपर्यंत कोणतीही फ्लाइट उपलब्ध नाही.
@airindia My flight for Chandigarh to Leh today was cancelled because of IAF's technical issue on the runway. At the airport, I was told that I would be provided with an additional flight tomorrow. Now the customer care is stating that no flights are available till 23rd of May?!
— Stanzin Dewang (@DewangStanzin) May 16, 2023
दुसर्या एका युजरनं तक्रार केली आहे की, त्याचं फ्लाइट रद्द झालं आणि त्याला कोणताही परतावा मिळाला नाही. एका प्रवाशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये लेहला जाणारं त्यांचं विमान रद्द झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांची गर्दी दिसतेय.
@flyspicejet SG124 is cancelled due to airforce runway blocking n now we’re stuck at leh airport w/o any further communication@IndiGo6E also have flight from del to hyd 6E605 which are going to miss.Yet didnt receive refund for cancelled @GoFirstairways @AAI_Official @PMOIndia
— Vishv (@iamvishv07) May 16, 2023
दिल्ली विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांनी सांगितलं की, इंडिगोनं लेहला जाणारी उड्डाणं रद्द केली आहेत. इंडिगो ना आज लेहला घेऊन जायला तयार ना नुकसान भरपाई द्यायला तयार. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांनी या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ट्विटरवर त्यांच्या प्रवाशांशी संपर्क साधला आहे.