MiG-21 Aircraft Crashed: वायुसेनेचं MiG-21 लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त; स्क्वाड्रन लीडरचा मृत्यू
पंजाबमधील मोगाजवळ गुरुवारी रात्री उशिरा, भारतीय वायुसेनेचं एक बायसन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं
चंदीगढ : पंजाबमधील मोगाजवळ गुरुवारी रात्री उशिरा, भारतीय वायुसेनेचं एक बायसन लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झालं. नियमित प्रशिक्षण सुरु असताना ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये वैमानिक स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटनेबाबत वायुसेनेनं दु:ख व्यक्त करत दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय वायुसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे.
वेस्टर्न सेक्टरमध्ये काल रात्री बायसन एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक, स्क्वाड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला वायुदल आधार देत आहे असं वायुसेनेनं ट्विट केलं. पुढे सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेशही देण्याच आल्याचं वायुदलानं सांगितलं आहे.
'या' कारणामुळे रॉयल एनफिल्डने परत मागवल्या 2.36 लाख बाईक्स
There was an aircraft accident last night involving a Bison aircraft of IAF in the western sector. The pilot, Sqn Ldr Abhinav Choudhary, sustained fatal injuries. IAF condoles the tragic loss and stands firmly with the bereaved family.
— Indian Air Force (@IAF_MCC) May 21, 2021
यंदाच्या वर्षी मिग 21 च्या अपघाताची ही तिसरी घटना. मार्च महिन्यात ग्रुप कॅप्टन, ए. गुप्ता यांचाही अशाच अपघाताच मृत्यू झाला होता. त्यापूर्वी यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यात राजस्थानमध्येही मिग क्रॅश होण्याची घटना घडली होती. वेस्टर्न सेक्टरमध्ये सॉर्टीदरम्यान, काही गंभीर तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ही घटना घडल्याची माहिती वायुदलाकडून देण्यात आली होती.