भारतानं पाकिस्तानचं सर्वाधिक ताकदीचं लढाऊ विमान पाडलं, अमेरिकन बनावटीच्या F-16 ची वैशिष्ट्ये कोणती?
Indian Army : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानचं अमेरिकन बनावटीचं विमान पाडलं आहे. पाकिस्ताविरुद्ध यामुळं भारताचं मनोबल वाढलेले आहे.

नवी दिल्ली : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू, राजस्थान, पंजाबच्या काही भागांमध्ये ड्रोन हल्ले केले. ड्रोन हल्ल्यांशिवाय पाकिस्ताननं भारतातील विविध भागात मिसाईल आणि लढाऊ विमानांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताच्या एअर डिफेन्स यंत्रणेनं ते हल्ले परतवले. भारतानं पाकिस्तानच्या F-16 या लढाऊ विमानाचा पाडाव केला. याशिवाय याच्या पायलटला देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्ताननं पाठवलेले F-16 हे विमान जगभरातील अधिक विश्वसनीय अन् अत्याधुनिक, लोकप्रिय लढाऊ विमान समजलं जातं.
F-16 हे विमान वजनाला हलकं, स्वस्त आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं अत्याधुनिक आहे. याची निर्मिती शत्रूच्या कोणत्याही हल्ल्याला वेगानं उत्तर देण्यासाठी करण्यात आली आहे. F-16 या विमानाच्या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्ये फ्लाय बाय वायर सिस्टीम आहे. सर्वसाधारणपणे विमानात पायलटची कंट्रोल स्टिक डायरेक्ट विमानाच्या भागांशी जोडलेला असतो. तर, F-16 मध्ये पायलटचा कंट्रोल एका संगणकाशी जोडलेला असतो. जो प्रत्येक आदेशाला इलेक्ट्रॉनिक रुपात कंट्रोल सरफेस पर्यंत पोहोचवतो. यामुळं विमानाची स्थिरता आणि हालचाल उत्कृष्ट असते.
F-16 मध्ये पायलटसाठी एक खास इजेक्शन सीट असते. जी 30 अशांपर्यंत झुकलेली असते. त्यामुळं गुरुत्वाकर्षण बलाचा दाब कमी होतो. यामुळं विमान जास्त काळापर्यंत सुरक्षित उड्डाण करु शकतं.
जगभरातील हवाई दलांची F-16 ला पसंती
F-16 या लढाऊ विमानात केवळ एक पायलट बसू शकतो. यामध्ये सहा हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या सहा मिसाईल, साइडवायंडर एआयएम -9, एआयम-120 एएमआर एएएमला घेऊन जाऊ शकतं. याचं वजन 8570 किल असतं. तर लांबी 15.06 मीटर आणि विंग स्पॅन 9.96 मीटर असते. त्यामुळं F-16 विमान जगभरातील हवाई दलाची पहिली पसंत आहे.
रशियासोबतच्या युद्धावेळी यूक्रेनकडून अमेरिकेला F-16 ची मागणी केली होती.F-16 हे जगातील सर्वात सुरक्षित आणि भरवश्याचं लढाऊ विमान आहे. अमेरिकेनं 1973 मध्ये त्यांनी विमान उत्पादन सुरु केलं होतं. डिसेंबर 1976 मध्ये पहिलं उड्डाण झालं होतं. दरम्यान, F-16 या विमानांची निर्मिती आणि मालकी सध्या लॉकडीड मार्टिन यांच्याकडे आहे. तर, याचं ऑपरेशनल उड्डाण जानेवारी 1979 मध्ये झालं होतं. लॉकहीड मार्टीनच्या मते जगभरातील 25 हून अधिक देशांकडे F-16 विमानं आहेत. पाकिस्तान कडे देखील हे विमान आहे.
























