एक्स्प्लोर
पाकिस्तानचा 'एमएफएन' दर्जा रद्द, 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणजे काय?
व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. पण आता प्रश्न आहे की, मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ काय? हा दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानवर त्याचा काय परिणाम होणार?

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर पाकिस्तानविरुद्ध पहिलं मोठं पाऊल उचललं आहे. व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीच्या (सीसीएस) बैठकीत घेण्यात आला. पण आता प्रश्न आहे की, मोस्ट फेवर्ड नेशनचा अर्थ काय? हा दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानवर त्याचा काय परिणाम होणार? काय आहे एमएनएफ दर्जा? एमएफएन म्हणजेच मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला व्यापाराबाबत सुविधा मिळतात. मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळणाऱ्या देशाला या गोष्टीची खात्री असते की, त्याला व्यापाऱ्यात कोणतंही नुकसान होणार नाही. मोस्ट फेवर्ड नेशनच्या नियमानुसार, कोणताही देश विविध देशांमधील व्यापारासंबंधी करारात भेदभाव करु शकत नाही. एमएफएनच्या नियमाअंतर्गत दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. याचा अर्थ आहे की, व्यापारात मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेला देश, दुसऱ्या देशाच्या तुलनेत तोट्यात राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा लाभ मिळतो, अशी सामान्य धारणा आहे. 'एमएफएन' दर्जाचा फायदा काय? मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा मिळालेल्या देशाला व्यापारात प्राधान्य दिलं जातं. एमएफएनचा दर्जा मिळाल्यावर आयात-निर्यातीमध्ये विशेष सवलत मिळते. यात दर्जा मिळालेला देश सर्वात कमी शुल्कावर व्यापार करतो. VIDEO | मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजे काय? | एबीपी माझा भारताने का दिला एमएफएन दर्जा? जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेनंतर भारताने पाकिस्तानला 1996 मध्ये मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. पण आश्वासन देऊनही पाकिस्तानने आजपर्यंत भारतला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या एमएफएन दर्जाबाबत चाचपणी केली होती. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा कधी काढतात? डब्लूटीओच्या आर्टिकल 21बी अंतर्गत, दोन्ही देशांमध्ये सुरक्षेसंदर्भातील मुद्द्यांवर वाद सुरु असेल तर कोणताही देश एखाद्या देशाचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेऊ शकतो. मात्र यासाठी अनेक अटी आणि शर्ती पूर्ण कराव्या लागतात. भारत-पाकिस्तानमध्ये या वस्तूंचा व्यापार! सध्या भारत पाकिस्तानला प्रामुख्याने साखर, चहा पावडर, ऑईल केक, पेट्रोलियम ऑईल, कापूर, टायर, रबरसह 14 वस्तूची निर्यात करतो. तर भारत पाकिस्तानकडून पेरु, आंबा, अननस, फॅब्रिक कॉटल, सायक्लिक हायड्रोजन, पोर्टलॅण्ड सिमेंट, कॉपर वेस्ट आणि स्क्रॅप यांसारखी उत्पादनं आयात करतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























