PM Modi : सुस्साट! देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन, हुगळी नदीतील बोगद्यातून धावणार मेट्रो
First Underwater Metro : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन पार पडलं आहे. कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून ही मेट्रो धावणार आहे.
India's First Underwater Metro : देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं (Under Water Metro Train) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगाल (West Bengal) दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटने केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता (Kolkata) येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं (Under Water Metro Inauguration) उद्घाटन केलं आहे. कोलकाताच्या हुगळी नदीमधील बोगद्यातून ही मेट्रो सुस्साट धावणार आहे.
देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवेत दाखल
ही पाण्याखालील मेट्रो बोगदा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागादरम्यान धावेल. कोलकाता मेट्रो हावडा मैदान-एस्प्लेनेड बोगदा हा भारतातील कोणत्याही नदीखाली बांधला जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे. कोलकाताची पाण्याखालील मेट्रो (Kolkata Underwater Metro) हुगळी नदीखाली (Hooghly River)बांधण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला होता आणि आज पंतप्रधान मोदींनी पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचं लोकार्पण केलं आहे.
Prime Minister @narendramodi will inaugurate India's first underwater metro rail service today in Kolkata.pic.twitter.com/Z62kfcMBEZ
— All India Radio News (@airnewsalerts) March 6, 2024
पंतप्रधानांचं अंडरवॉटर मेट्रोने प्रवास
पंतप्रधान मोदी यांनी अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यातून प्रवासही केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अंडरवॉटर मेट्रोनं प्रवास करताना शालेय विद्यार्थ्यांशी संवादही साधला आहे.
पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद
#WATCH | West Bengal: Prime Minister Narendra Modi travels with school students in India's first underwater metro train in Kolkata. pic.twitter.com/95s42MNWUS
— ANI (@ANI) March 6, 2024
पंतप्रधानांकडून पुणे मेट्रोला हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदी यांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी पंतप्रधानांनी ऑनलाईन पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमिपूजन करण्यात आले. याबरोबरच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान मोदी 5 राज्यांच्या दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी कोलकातानंतर बिहारसाठी रवाना झाले आहेत. बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेतिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मोठी सभा होणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या रॅलीला राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित राहणार नाहीत, कारण ते आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 मार्चपासून पाच राज्यांच्या दौऱ्यावर आहेत, ज्याच्या शेवटच्या टप्प्यात ते आज बिहारमधील बेतिया येथे पोहोचणार आहेत. याआधी पीएम मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालला गेले आहेत. आपल्या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.