एक्स्प्लोर
Advertisement
कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर, रुग्णसंख्या तीन लाखांजवळ
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानावर आलाय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजारांवर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात 1 लाख 47 हजार हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई : देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त बळी गेले आहेत. 24 तासात सर्वाधिक 396 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 24 तासात आत्तापर्यंतची सर्वाधिक 10 हजार 956 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील 1 लाख 47 हजार 195 बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 49.47 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 14 हजार 842 रुग्ण देशात आहेत.
गेल्या 24 तासांत 6 हजार 165 रुग्ण बरे झाले तर 396 मृत्यू कोरोनामुळं झाले आहेत. देशात एकूण बळींची संख्या 8 हजार 498 झाली आहे. या महिन्याच्या 1 तारखेला कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 होती. आज 2 लाख 97 हजार 535 म्हणजे गेल्या बारा दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 7 हजाराने वाढली आहे. 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढण्याचा 4 जूनपासून सलग नववा दिवस आहे.
महाराष्ट्रात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा हा सलग दुसरा दिवस होता. परिणामी राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य
तामिळनाडू 38716 रुग्ण, 20705 बरे झाले, मृतांचा आकडा 349
दिल्ली 34687 रुग्ण, 12731 बरे झाले, मृतांचा आकडा 1085
गुजरात 22032 रुग्ण, 15101 बरे झाले, मृतांचा आकडा 1385
राजस्थान 11838 रुग्ण, 8775 बरे झाले, मृतांचा आकडा 265
मध्यप्रदेश 10241 रुग्ण, 7042 बरे झाले, मृतांचा आकडा 431उत्तरप्रदेश 12088 रुग्ण, 7292 बरे झाले, मृतांचा आकडा 345
पश्चिम बंगाल 9768 रुग्ण, 3988 बरे झाले , मृतांचा आकडा 442
जगात सर्वाधिक कोरोनाबाधित असलेले दहा देश- अमेरिका: कोरोनाबाधित - 2,089,684, मृत्यू- 116,029
- ब्राझील: कोरोनाबाधित - 805,649, मृत्यू- 41,058
- रशिया: कोरोनाबाधित - 502,436, मृत्यू- 6,532
- भारत: कोरोनाबाधित - 298,283, मृत्यू- 8,501
- यूके: कोरोनाबाधित - 291,409, मृत्यू- 41,279
- स्पेन: कोरोनाबाधित - 289,787, मृत्यू- 27,136
- इटली: कोरोनाबाधित - 236,142, मृत्यू- 34,167
- पेरू: कोरोनाबाधित - 214,788, मृत्यू- 6,109
- जर्मनी: कोरोनाबाधित - 186,795, मृत्यू- 8,851
- इराण: कोरोनाबाधित - 180,156, मृत्यू- 8,584
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement