ताजिकिस्तानमध्ये आज 'हार्ट ऑफ आशिया' परिषद, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार?
भारत (India) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) परराष्ट्र मंत्र्यांची भेट होणार असल्याचं या आधी नाकारण्यात आलंय. पण हार्ट ऑफ आशिया (Heart of Asia Conference) परिषदेचा इतिहास पाहता या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची अनेकदा अनौपचारिक बैठक झाली आहे.
नवी दिल्ली : ताजिकिस्तानमध्ये आज नववी 'हार्ट ऑफ आशिया' परिषद पार पडणार आहे. या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर ताजिकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार का याकडे सर्व देशांच्या नजरा लागल्या आहेत.
हार्ट ऑफ आशिया परिषदेची बैठक आज सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. त्या आधी, सोमवारी रात्री ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमामोली रहमान यांनी सर्व विदेशी राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हेही उपस्थित होते. त्यावेळी हे दोन नेते काय बोलणार याकडे उपस्थितांचे लक्ष होते.
सध्या या दोन मंत्र्यांमध्ये कोणतीही बैठक होणार नाही असं सांगण्यात जरी येत असलं तर हार्ट ऑफ आशियाचा इतिहास पाहता या आधी या दोन देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अनौपचारिक बैठक झाल्याचा इतिहास आहे.
सोमवारी ताजिकिस्तानला पोहचल्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत चवुशोलोव्ह यांच्याशी अफगानिस्तानला देण्यात येणाऱ्या मदतीबद्दल चर्चा झाली. तसेच इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद शरीफ यांच्याशीही छाबाहार बंदराच्या विकासाबद्दल आणि इतर मुद्द्यावरुन चर्चा झाली.
महत्वाच्या बातम्या :