एक्स्प्लोर

'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला.

नवी दिल्ली : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशावासीयांना संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशवादाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तानसोबत (Pakistan) चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल, असे मोदींनी ठणकावून सांगितले. तर, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून (Indian army) सांगण्यात आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची जाहीर केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच सीमारेषेवर गोळीबार सुरू झाला होता. त्यावरुन,पु्न्हा एकदा दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.  

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेनुसार दोन्ही देशांच्या सीमारेषेवर एकाही बंदुकीतून गोळी सुटणार नाही. सीमारेषेवर आणि पुढील भागातून तत्काळ दोन्ही देशांनी आपलं सैन्य कमी करण्यासंदर्भातही या संभाषणात चर्चा झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, यापुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी कायम असणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा पाकिस्तान ठणकावत जगाला संदेश दिला आहे. ऑपरेशन सिंदूर संपलं नसून त्यास स्थगिती देण्यात आल्याचे मोदींनी म्हटलं.  

माता-भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांना दाखवून दिलं

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना धर्म विचारुन ठार मारले. दहशवाद्याचा (Terrorist) हा विभत्स चेहरा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली होती. आमच्या आया-बहिणीचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन केलं. 

हेही वाचा

Video आमच्या आया-बहिणींचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं; हल्ल्यानंतर पहिल्यांचे बोलले मोदी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget