एक्स्प्लोर

Operation Sindoor : पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताचं स्पष्ट उत्तर, सोफिया कुरेशी अन् व्योमिका सिंह ऑपरेशन सिंदूरच्या मेसेंजर

Sofiya Qureshi and Vyomika Singh : पुरुषांना धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने स्पष्ट उत्तर दिलं आहे. भारताच्या कामगिरीची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी जगाला दिली. 

मुंबई : पहलगाममध्ये जिहादी अतिरेक्यांनी  निष्पाप पर्यटकांना धर्म विचारुन मारलं. ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्या माताभगिनींचा आक्रोश सगळ्या जगाने ऐकला. त्या आक्रोशाचं उत्तर भारताने ऑपरेशन सिंदूरनं दिलं. 15 दिवसांत पाकिस्तानमधले अतिरेकी अड्डे भारतीय सेनेनं हवाई हल्ला करुन उद्धवस्त केले. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी भारतीय सेनेनं दोन जिगरबाज, तडफदार महिला अधिकाऱ्यांवर टाकली. कर्नल सोफिया कुरेशी (Col Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Wing Commander Vyomika Singh) त्यांचं नाव. 

भारताच्या सैन्यदलांनं पाकव्याप्त काश्मीरमधील 5 आणि पाकिस्तानच्या हद्दीतील 4 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगाम हल्ला करणाऱ्य़ांवर 9 ठिकाणी प्रहार केला. त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, भारतीय सेना आणि हवाई दलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

मागे काळ्या पडद्यावर भारताची राजमुद्रा आणि त्या खाली ऑपरेशन सिंदूर हे शब्द... सगळा देश उत्सुकतेनं वाट बघत असतानाच परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची एन्ट्री झाली. त्यांच्या पाठोपाठ दोन महिला अधिकारी खुर्चीवर विराजमान झाल्या. एक होत्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योमिका सिंह. 

विक्रम मिस्त्री यांनी थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केलेल्या काटेकोर हल्ल्याचे पुरावे जगासमोर मांडण्याची जबाबदारी सोपवली कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याकडे. त्यानंतर या दोन तडफदार महिला अधिकाऱ्यांनी माईकचा ताबा घेतला. 

Who Is Sophia Qureshi : कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी? 

- गुजरातमधील बडोद्याच्या रहिवासी
- बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर पदवी
- 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत लष्करात दाखल. 
- बहुराष्ट्रीय 'एक्सरसाईज फोर्स 18' प्रोग्रॅमचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी.
- 2006 मध्ये कांगोत संयुक्त राष्ट्रांच्या शांती अभियानात सहभागी.
- घरात लष्कराचा समर्थ वारसा, आजोबांनी भारतीय सेनेत सेवा केली आहे.
- पती मेजर ताजुद्दिन कुरेशी मेकनाईज्ड इन्फंट्रीचे अधिकारी आहेत. 

Who Is Vyomika Singh : कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंह?

- 18 डिसेंबर 2004 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत हवाई दलात.
- हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून हाय अल्टिट्युड मिशनचं नेतृत्व.
- चेतक, चिताहसारख्या हेलिकॉप्टरनी 2,500 पेक्षा अधिक तासांच्या उड्डाणाचा विक्रम.
- नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशात बचाव मोहिमेचं नेतृत्व. 

भारतीय सैन्यांत अनेक दिग्गज अधिकारी असताना यो दोन तरुण महिला अधिकाऱ्यांची एअर स्ट्राईकबद्दल माहिती देण्यासाठी निवड का केली याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. पहलगाममध्ये जिहादी दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 पुरुषांना मारलं. त्या हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आणि धर्माच्या नावावर भारतात फूट पाडू पाहणाऱ्या दहशतवादी आणि पाकिस्तानलाही उत्तर दिलं. 

दहशतवाद्यांनी पुरुषांवर गोळी चालवताना महिलांना सांगितलं होतं, मोदी को जाके बोल देना... त्याच दहशतवाद्यांच्या आकांचं कंबरडं मोडल्यानंतर ते जगाला सप्रमाण सांगण्यासाठी पुढे सरसावल्या भारतीय सैन्य दलातल्या दोन जिगरबाज महिला. 

एक हिंदू महिला अधिकारी आणि एक मुस्लिम महिला अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन भारतानं पाकिस्तान विचार करतो त्याची कितीतरी पुढे आपण असल्याचं दाखवून दिलं. भारताविरोधात धर्माचं तुणतुणं वाजवणाऱ्या पाकिस्तानला हीसुद्धा एक मोठी चपराक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget