एक्स्प्लोर
Advertisement
भारतात कोरोना प्रादुर्भावाने शिखर गाठून उतरण सुरु झाल्याची शक्यता.. अर्थमंत्रालयाचा अहवाल
भारतात कोरोनाने कदाचित याआधी त्याच्या तीव्रतेसंबंधी सर्वोच्च अवस्था गाठली असून आता त्याच्या प्रादुर्भावाची घसरण सुरु झाल्याची शक्यता अर्थमंत्रालयाने वर्तवलीय. अर्थमंत्रालयाने सप्टेंबर महिन्याच्या आढावा अहवालात ही माहिती दिलीय. त्याचबरोबर अनलॉक आणि सरकारी पॅकेज यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचा दावा केलाय.
आपल्या सप्टेंबर महिन्याच्या आर्थिक आढावा अहवालात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी म्हंटले आहे की भारताने कदाचित कोविड 19 आजारासंबंधी सर्वोच्च शिखर अवस्था गाठली असेल. 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यानची माहिती हे सूचित करते की सात दिवसांच्या काळात कोविड 19 च्या केसेस् या प्रति दिन 93,0000 वरून सातत्याने कमी होवून त्या 83,000 इतक्या आल्या तर सरासरी चाचण्यांची संख्या ही 1,15,000 वरून 1,24,000 इतकी वाढली असे रविवारी प्रकाशित झालेल्या या अहवालात म्हटले आहे. यात असेही स्पष्ट केले आहे शासनाचे आर्थिक पॅकेज आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असलेले अनलॉक यांमुळे सप्टेंबर महिन्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्था सुधारत आहे.
हा अहवाल कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे स्पष्ट करताना असेही सांगतो की देशपाळीवर कोरोनाच्या संख्येत होत असलेली घट ही स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यासाठी महत्वाची ठरते. 'सोशल डिस्टंसिंग' पेक्षा सावधगिरी बाळगून स्वत:चे संरक्षण करणे ही 'जान भी और जहां भी' संकल्पनेत चांगली उचित बसते असेही या अहवालात म्हटले आहे.
आर्थिक निर्देशांक जवळपास सर्वच क्षेत्रात सुधारत असताना काही क्षेत्रांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक वाढ दर्शवली आहे आणि ही स्थिती लहान शहरांत आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसर वाढत असतानादेखील आहे. लॉकडाऊन लागू केल्याने जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्था उणे 24 इतकी घसरली होता. 'आत्मनिर्भर भारत पॅकेज' आणि सातत्याने होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेमुळे या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे सप्टेंंबरच्या या आर्थिक आढावा अहवालात म्हंटले आहे.
देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या वर गेलीआहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या 66 लाख 23 हजार इतकी झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत भारत सध्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे कोरोनाचा मृत्यूदर जरी देशात कमी असला तरी दररोज सरासरी हजाराच्या आसपास रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे.नुकतंच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे की, सरकारकडून जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते. सरकारला कोरोना लसीचे 400 ते 500 कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत 25 कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे. यादरम्यान अनेक क्षेत्रं हळूहळू सुरू होत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. याचवेळी केंद्र सरकारचा हा अर्थव्यवस्थेसंबंधी आलेला सप्टेंबर महिन्याचा हा अहवाल दिलासादायक असेल.
संबंधित बातम्या
कोरोना कधी जाणार, लस कधी येणार, काही निश्चित नाही; अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं कायम : अर्थमंत्रीसीतारामन यांच्या 'कोरोना देवाची करणी' वक्तव्यावर चिदंबरम म्हणाले 'अर्थमंत्री मेसेंजर ऑफ गॉड'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शेत-शिवार
राजकारण
राजकारण
Advertisement