India COVID 19 Cases : गेल्या 24 तासात देशात 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 65 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 65 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India COVID 19 Cases : सध्या देशारात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. देशात रोज दोन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात कोरोनामुळे 65 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या पेक्षा आज कोरोवा रुग्णांच्या संख्येत थोडीशी घट झाली आहे. काल देशात 2 हजार 323 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
सक्रिय रुग्णांची संख्या कमी
आज (22 मे) जाहीर झालेल्या आकडेवारीत मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी 21 मे रोजी कोरोनाचे एकूण 2 हजार 323 नवीन रुग्ण आढळून आले होते आणि 25 जणांचा मृत्यू झाला होता. आज 2 हजार 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 65 जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, सक्रिय प्रकरणांमध्ये आता थोडीशी घट झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजारांवरुन आता 14 हजार 955 वर आली आहे. जी सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जवळपास 2 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.
संसर्ग दर कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत 41 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. संसर्गाचा दैनंदिन दर 0.50 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक संसर्ग दर देखील 0.50 टक्के होता. आत्तापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या ही 4 कोटी 25 लाख 97 हजार 3 झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.22 टक्के नोंदवले गेले आहे. देशव्यापी अँटी-कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192.28 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. काल राज्यामध्ये 307 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल एकूण 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 78,82,476 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.