(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Updates : देशात सात महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, 24 तासांत 18 हजार 346 नवे रुग्ण
India Coronavirus Updates : देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
India Coronavirus Updates : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात 209 दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जाणून घेऊयात देशातील आजची कोरोना स्थिती...
आतापर्यंत 4 लाख 49 हजार 260 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल (सोमवारी) 29 हजार 639 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 52 हजार 902 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 53 हजार 48 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण ठिक झाले आहेत.
कोरोनाचा विळखा सैल; राज्यात काल 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 026 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 389 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 86 हजार 059 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात आज 26 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 839 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (14), नंदूरबार (2), धुळे (2), जालना (40), परभणी (72), हिंगोली (15), नांदेड (08), अकोला (22), वाशिम (06), बुलढाणा (23), नागपूर (99), यवतमाळ (09), वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 33 हजार 637 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,088 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,355 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 93,37, 713 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,62, 514(11.06 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 341 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 520 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,571 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1154 दिवसांवर गेला आहे.