एक्स्प्लोर

India Corona Updates : 5 दिवसांनी 40 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, 65 टक्के रुग्ण फक्त केरळात

India Coronavirus Updates : गेल्या 24 तासांत 30,941 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

India Coronavirus Updates : भारतात पाच दिवसांनी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर मृतांचा आकडाही कमी झाला आहे. मंगळवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,941 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 350 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत 36,275 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशात सलग पाच दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. अशातच आज मात्र दैनंदिन रुग्णवाढीत काही प्रमाणात दिलासा मिळाला असून आज 40 हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी 46164, गुरुवारी 44658, शुक्रवारी 46759, शनिवारी 45083 आणि सोमवारी 42909 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. 

भारतातील कोरोनाची एकूण आकडेवारी 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत एकूण तीन कोटी 27 लाख 68 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 38 हजार 560 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 19 लाख 59 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. एकूण 3 लाख 70 हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. 

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 27 लाख 68 हजार 880
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 19 लाख 59 हजार 680
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 70 हजार 640
एकूण मृत्यू : चार लाख 38 हजार 560
एकूण लसीकरण : 64 कोटी 5 लाख 28 हजार लसीचे डोस

महाराष्ट्रात काल (सोमवार) 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल (सोमवार) 3,741 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 68 हजार 112 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 02टक्के आहे. 

राज्यात काल (सोमवार) 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 45 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (सोमवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 51 हजार 834रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 717 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (48), नंदूरबार (2),  धुळे (20), जालना (17), परभणी (39), हिंगोली (59),  नांदेड (27),  अमरावती (95), अकोला (23), वाशिम (7),  बुलढाणा (50), यवतमाळ (6), नागपूर (78),  वर्धा (5), भंडारा (7), गोंदिया (4),  गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. 

मालेगाव, धुळे, जळगाव, हिंगोली, परभणी, नांदेड, अकोला, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 38,12,827 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,60,680 (12.01 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,88,489 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,299  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

1 सप्टेंबरपासून दिल्लीत नववी ते बारावीचे शाळा, कॉलेज, युनिवर्सिटी, कोचिंग इंस्टिट्यूट सुरु, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
CJP Protest: दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
दिल्लीतील आंदोलनात 'तो' नक्षलवादी काय करत होता? अभिजीत दिपके जबाबदारी घेणार का? जनसंघर्ष समितीची प्रश्नांची सरबत्ती
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget