एक्स्प्लोर

Coronavirus Cases Today: कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार

आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल.

Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. देशभरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे सरकारसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य मंत्रालयानं (Indian Ministry of Health) शुक्रवारी (14 एप्रिल) दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 109 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 49 हजारांच्या पुढे गेली आहे.

देशात एका दिवसापूर्वी म्हणजेच 13 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 1000 नवीन रुग्णांची भर पडली होती. यावरून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव किती वेगाने होतोय, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 13 एप्रिल रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे 10 हजार 158 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे की, कोरोनाबाधितांची संख्या पुढील 10 दिवसांत आणखी वाढणार आहे. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत घट दिसून येईल. नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.  

गेल्या पाच दिवसातील देशातील कोरोनाची रुग्णसंख्या 

9 एप्रिल : 5,357
10 एप्रिल : 5,880
11 एप्रिल : 5,676 
12 एप्रिल : 7,830
13 एप्रिल : 10,158 

राज्यासह मुंबईतही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

दरम्यान, राज्यातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतच आहे. 13 एप्रिल गुरुवारी महाराष्ट्रात (Maharashtra Coronavirus Update) 1 हजार 86 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात राज्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत  (Mumbai Coronavirus Update) गेल्या चोवीस तासांत 274 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याचदरम्यान मुंबईत 216 रुग्ण कोरोनातून बरे झाले. त्यामुळं मुंबईतल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 1 हजार 635 वर पोहोचली आहे.  

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलेलं आवाहन

कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात बूस्टर डोस ज्यांनी घेतले नसतील अशांनी बूस्टर डोस घेतले पाहिजे. लस घेतली असेल तरीही तुम्हाला कोविड होऊ शकतो. मात्र आजाराची तीव्रता कमी होताना बघायला मिळते. सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. अशात त्यांनी बूस्टर डोस घेतला पाहिजे. रुग्णालयात जात असाल तर मास्क घालावा. ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप आहे अशांनी मास्क घातला पाहिजे. बंदिस्त ठिकाणी जात असाल तर मास्क घालावा, असं आवाहन कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी यांनी केलं आहे. 

संबंधित बातम्या

Maharashtra Corona : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, 2 ते 3 दिवसात सरकार नियमावली जाहीर करणार

Mumbai Corona Updates: मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य

Coronavirus Cases Today: कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget