एक्स्प्लोर

इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; आता फक्त समन्वय समिती, इतर समित्यांच्या बैठका होणार

इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. चेन्नई, कोलकाता अशा इतर राज्यात आता बैठका होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

I.N.D.I.A Alliance: भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये बैठकांचं आयोजन केलेलं. सर्वात आधी इंडिया आघाडीची बैठक पाटण्यात पार पडली, मग बंगळुरू आणि त्यानंतर मुंबईत पार पडली. इंडिया आघाडीची चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याचं बोलंल जात होतं, पण आता भोपाळमध्ये बैठक होणार नसल्याचं समोर आलं आहे. इंडिया आघाडीच्या आता मोठ्या बैठका होणार नसून अशा मोठ्या बैठकांना पूर्णविराम देण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतल्याची माहिती मिळत आहे. 

इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम देण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. चेन्नई, कोलकाता अशा इतर राज्यात आता बैठका होणार नसल्याची माहिती मिळत आहे. आता केवळ समन्वय समिती आणि इतर समित्यांच्या बैठका होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता 13 सप्टेंबरला शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.  

प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार

या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.

इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम

सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे. 

लोगोचं अनावरण लांबणीवर

इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्यानं आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल, असं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Embed widget