एक्स्प्लोर

'एक देश, एक संविधान'नंतर आता 'एक देश, एक निवडणूक'वर विचार करण्याची वेळ : मोदी

नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छांसह रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयासह कलम 370 च्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

नवी दिल्ली : देशभरात आज 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकावला आणि देशाला संबोधित केलं. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छांसह रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा दिल्या आहे. लाल किल्ल्यावरील आपल्या सहाव्या भाषणात मोदींनी अनेक महत्त्वाच्या विषयासह कलम 370 च्या मुद्द्यावरही भाष्य केलं. सोबतच जलसंकट, लोकसंख्या वाढीवर विशेष लक्ष दिलं. यादरम्यान त्यांनी तिन्ही सैन्यदलात समन्वय साधण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे नवं पद निर्माण करण्याची घोषणा केली. भारतीय सैन्याच्या इतिहासात हे पद पहिल्यांदा बनलं आहे. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पूरग्रस्तांप्रति दु:ख व्यक्त केलं. एकीकडे देश स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, मात्र दुसरीकडे देशातील अनेक भागात पूरस्थिती आहे. पूरग्रस्तांचं मी त्यांचं सांत्वन करतो. तिथलं जनजीवन सुरळीत करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. कलम 370 वर मोदी काय म्हणाले? "आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळतही नाही. जे काम 70 वर्षात झालं नाही ते आमच्या सरकारने 70 दिवसात केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने यावर निर्णय झाला. देशाने मला हे काम दिलं हों आणि मी तेच करत आहे. जम्मू-काश्मीरबाबक 70 वर्षात प्रत्येकाना काही ना काही केलं, पण त्याचा परिणाम दिसला नाही. काश्मीर खोऱ्यातील लोकांना अनेक सुविधांचा लाभ मिळत नव्हता. तिथे भ्रष्टाचार आणि फुटिरतावादाने पाय रोवले होते. दलित, गुर्जरांसह अनेकांना अधिकार मिळत नव्हते आणि त्यांना ते मिळणार आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. कलम 370 वरुन विरोधकांवर प्रहार जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सर्व राजकीय पक्षांमध्ये कोणी ना कोणी नेता आहेच ज्याने कलम 370 ला विरोध किंवा पाठिंबा दिला आहे. पण कलम 370 चं समर्थन करणाऱ्यांना मोदींनी प्रश्न विचारला की, हे कलम एवढंच गरजेचं होतं मग 70 वर्षात तुम्ही त्यांना तात्पुरतं नागरिक ठेवलं? पुढे येऊन त्यांना पर्मनंट नागरिक बनवायचं, पण तुमच्यात तेवढी हिंमत नव्हती. आज प्रत्येक व्यक्ती 'एक देश, एक संविधान' हे अभिमानाने सांगत आहे. आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या विचाराला पुढे घेऊन जात आहोत. जीएसटीद्वारे आम्ही 'एक देश, एक कर'चं स्वप्न पूर्ण केलं. ऊर्जाच्या 'एक देश, एक ग्रीड'ला पुढे नेलं. आता गरज आहे की, देशात एकत्रित निवडणुकीचीही चर्चा व्हावी." तिहेरी तलाकबाबत मोदी म्हणाले... आम्ही 'सबका साथ-सबका विकास'चा मंत्र घेऊन चालत होतो. पण पाच वर्षात 'सबका साथ-सबका विकास आणि सबका विश्वास' बनला आहे. आता आम्ही संकल्पातून सिद्धीच्या दिशेने जात आहोत. "देश दहशतवादाविरोधात एकत्र लढण्यासाठी कटिबद्ध आहे. देशातील मुस्लीम लेकी भीतीचं आयुष्य जगत होत्या. त्या तिहेरी तलाकच्या बळी ठरल्या नसल्या तरी त्यांच्या मनात कायम भीती असे. मुस्लीम देशांनी जर तिहेरी तलाक बंद केला असेल, तर आपण का नाही? जर देशात हुंडा, स्त्रीभ्रूण हत्याविरोधात कायदा बनू शकतो, तर तिहेरी तलाकविरोधात का नाही? असं मोदी म्हणाले. तिन्ही सैन्यदलाचा प्रमुख 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन मोठी घोषणा केली. "तिन्ही सैन्यदलामध्ये समन्वय साधण्यासाठी नव्या पदाची घोषणा केली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं या पदाचं नाव असेल. सैन्याच्या इतिहासात या पदाची पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलं आहे," असं मोदी म्हणाले.
देशाची विचारधारा बदलली आहे : मोदी आज देशाची विचारधारा बदलल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. जी व्यक्ती आधी बस स्टॉपची मागणी करत असे, ती आता विचारते की साहेब, विमानतळ कधी येणार? सुरुवातील गावात पक्क्या रस्त्यांची मागणी होती असे आणि लोक विचारतात रस्ता चार पदरी बनणार की सहा पदरी? देशाचा स्वभाव बदलला आहे.
छोटं कुटुंब ही देशभक्ती ज्या प्रकारे लोकांनी स्वच्छतेसाठी अभियान राबवलं, आता वेळ आहे पाणी वाचवण्यासाठीही असं काहीतरी करण्याची. पाणी वाचवण्यासाठी आपल्याला चौपट वेगाने काम करावं लागेल, असं आवाहन मोदींनी केलं. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आपल्याला या मुद्द्यासंदर्भात आगामी पीढीसाठी विचार करावा लागेल. छोट्या कुटुंबाने केवळ स्वत:चाच नाही तर देशाचंही भलं होणार आहे. ज्या लोकांनी या दृष्टीने पावलं उचललं आहे आणि छोट्या कुटुंबाचे फायदे लोकांना समजावत आहेत, त्यांचा आज सन्मान करण्याची आवश्यकता आहे. छोटं कुटुंब ही देशभक्तीप्रमाणे आहे. घरात बाळाच्या येण्यापूर्वी विचार करा, आपण यासाठी तयार आहोत का? त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार आहोत का?
प्रत्येक घरात पाण्यासाठी 'जल जीवन मिशन'ची घोषणा मोदी म्हणाले की, "आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारने देशाच्या भल्यासाठी काही ना काही केलं आहे. पण अजूनही 50 टक्के लोकांच्या घरात पिण्याचं पाणी उपलब्ध नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमचं सरकार आता प्रत्येक घरात पाणी या दिशेने पाऊल उचलत आहे." आपल्या भाषणात मोदींनी जल जीवन मिशन आणि त्यासाठी साडेतीन लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. याअंतर्गत पाणीसाठा, समुद्राच्या पाण्याचा वापर, सांडपण्याचा वापर, कमी पाण्यात शेतीबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवली जाईल, असं मोदी मोदी म्हणाले.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
देशातील अनेक भागात पूरग्रस्तस्थिती आहे, मी त्यांचं सांत्वन करतो, राज्य सरकारांनी जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान, योगदान देणाऱ्या सर्वांना नमन करतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 आणि कलम 35 अ हटणं हे सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त 10 दिवसात सरकारने देशहिताची पावलं उचलली : पंतप्रधान नरेंद्र मोदी निराशा आशेत बदलला, देश बदलू शकतो, हा विश्वास निर्माण झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी जर 2014 ते 2019 हा गरजांचा पूर्तता करण्याचा काळ होता, तर 2019 नंतरचा काळ हा देशवासियांच्या आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्याचा कालखंड आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र घेऊन आम्ही चाललो होतो, पण 5 वर्षातच देशवासियांनी 'सबका विश्वास'च्या रंगाने संपूर्ण वातावरण रंगवलं  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही अडचणी टाळत नाही किंवा कुरवाळत बसत नाही, अशी या सरकारची ओळख आहे. जे काम मागील 70 वर्षात झालं नाही ते 70 दिवसात झालं आज देश अभिमानाने सांगू शकतो की, 'वन नेशन, वन कॉन्स्टिट्यूशन' : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या काळात 'जल जीवन मिशन' सुरु करुन प्रत्येक घरात पिण्याच्या पाणी देण्याचा प्रयत्न, साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम या मिशनसाठी तरतूद केली जाईल. : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढती लोकसंख्या हे देशासमोरचं मोठं आव्हान आहे, छोटं कुटुंब म्हणजे देशभक्तीचं कार्य, छोट्या कुटुंबामुळे विकासाला चालना मिळते : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हळूहळू लोकांच्या आयुष्यातून बाहेर पडावं, जेणेकरुन ते स्वातंत्र्याने जगू शकतील. सरकारचा दबाव नसावा, किंवा सरकारचा अभाव नसावा  : पंतप्रधान नरेंद्र मोदी मी दरदिवशी एक कायदा रद्द केला, 1450 कायदे रद्द केले आहेत, ही स्वतंत्र भारताची आवश्यकता होती : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे, जगात आपलं स्थान प्रस्थापित करायचं आहे, पहिल्यांदा लोक विचारायचे पक्के रस्ते कधी होणार, आता 4-8 पदरी हायवे कधी बनणार, असं विचारतात?  : पंतप्रधान नरेंद्र मोदी काही देश केवळ भारतालाच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना दहशतवादाने उद्ध्वस्त करत आहे. बांगलादेश आणि श्रीलंकाही दहशतवादाचा सामना करत आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद नव्याने निर्माण करणार  : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लास्टिकमुक्तीसाठी अभियान सुरु करणं गरजेचं, दुकानांमध्ये प्लास्टिक पिशवी न मागण्याचं बोर्ड लावावा  : पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही लक्ष्य ठेवा की, देशातील कमीत कमी 15 पर्यटन स्थळांना भेट देऊन भारतीय संस्कृतीच विविधता पाहा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget