एक्स्प्लोर

LIVE : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

देशभरात आज 72वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लावरून पाचव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी तिहेरी तलाक, देशातील गरिबी, देशाची आर्थिक प्रगती, महिला सुरक्षा यासारख्या विविध विषयांना हात घातला. तसेच सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखाही सांगितला. स्वातंत्र्य दिनाला मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा देशातील गरिबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात केली जाणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे यापुढे देशातील कोणतंही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नसल्याचंही मोदी यांनी म्हटलं.

मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देणारच  तिहेरी तलाकसारख्या गंभीर आणि मुस्लीम महिलांच्या हिताच्या विषयावरही मोदींना भाष्य केलं. तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना आश्वस्त करत आहोत की आम्ही तो कायदा करणारच असल्याचं ठोस आश्वासन मोदींनी दिलं.

देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटना गंभीर असून बलात्काराची राक्षसी वृत्ती देशातून हद्दपार करायला हवी. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याने राक्षसी मनोवृत्ती कमी होईल. त्यामुळे बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल, असं मोदी म्हणाले.

स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे जीव वाचले स्वच्छता अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आल्याची माहिती यावेळी मोदींनी देशाला दिली. WHOच्या अहवालानुसार, भारतात स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे प्राण वाचल्याचं मोदींनी सांगितलं. मात्र स्वच्छता अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवल्याची आठवणही मोदींनी यावेळी करुन दिली.

देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांचं मोठं योगदान देशातील प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैज्ञानिकांचा गौरव मोदींनी लाल किल्ल्यावरून केला. एकाच वेळी अंतराळात 100 उपग्रह सोडून वैज्ञानिकांनी विक्रमी कामगिरी केली. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल. मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल. देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांचा वाटा मोठा आहे, असंही मोदींनी सांगितलं.

कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ देशातील कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली. 2013 पर्यंत टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 4 कोटी होती, आता टॅक्स भरणाऱ्यांची संख्या पावणे सात कोटी आहे. प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य होतं. देशातील करदात्यांमुळे लाखो कुटुंबाचं पोट भरतं, असंही मोदीं म्हणाले.

LIVE UPDATES 

  • न गाली से न गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार - पंतप्रधान मोदी
  • मुस्लीम महिलांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आम्ही लढा देऊ आणि  तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू- पंतप्रधान मोदी
  • तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना मी आश्वस्त करतो, आम्ही तो कायदा करणारच - पंतप्रधान मोदी
  • देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती, आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान- पंतप्रधान मोदी
 
  • बलात्काराची राक्षसी वृत्ती देशातून हद्दपार करायला हवी. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याने राक्षसी मनोवृत्ती कमी होईल. त्यामुळे बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल- पंतप्रधान मोदी
  • तुमच्या टॅक्समुळे तीन लाख लोकांचं पोट भरतं- पंतप्रधान मोदी
  • 2013 पर्यंत टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 4 कोटी होती, आता टॅक्स भरणाऱ्यांची संख्या पावणे सात कोटी आहे- पंतप्रधान मोदी
  • प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा, या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य - पंतप्रधान मोदी
  • पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात करणार
  • प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे यापुढे देशातील कोणतंही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही- पंतप्रधान मोदी
  •  प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार- पंतप्रधान मोदी
 
  • देशातील गरीबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' सुरू करणार आहे- पंतप्रधान मोदी
  • WHOच्या अहवालानुसार, भारतात स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे प्राण वाचले- पंतप्रधान मोदी
  • स्वच्छता अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवली होती- पंतप्रधान मोदी
  • एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत गरीबीरेषेतून वर आलेत- पंतप्रधान मोदी
  • खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला - पंतप्रधान मोदी
 
  • मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश- पंतप्रधान मोदी
  • २०२२ ला, स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल- पंतप्रधान मोदी
  • देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांचा वाटा मोठा आहे- पंतप्रधान मोदी
  • एकाच वेळी अंतराळात 100 उपग्रह सोडून वैज्ञानिकांनी विक्रमी कामगिरी केली- पंतप्रधान मोदी
 
  • 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे - पंतप्रधान मोदी
  • आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला - पंतप्रधान मोदी
  • ज्या शहरांची कधीही चर्चा नव्हती ती शहरं आज प्रगतीपथावर आहेत- पंतप्रधान मोदी
  • छोटी गावं, शहरांमध्ये स्टार्टअपला सुरूवात झाली आहे- पंतप्रधान मोदी
  • जगभरातील अर्थतज्ज्ञांकड़ून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक होतं आहे- पंतप्रधान मोदी
 
  • देशातील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं सुरू केली- पंतप्रधान मोदी
  • आमच्या सरकारमध्ये कठोर निर्णय घेण्याची क्षमता आहे, कारण देशहित आमच्यासाठी सर्वोच्च आहे - पंतप्रधान मोदी
  • 2013 मध्ये गॅस कनेक्शनसाठी जो वेग होता, तोच कायम ठेवला असता, तर प्रत्येक घरात गॅस पोहोचण्यासाठी अनेक वर्ष गेली असती - पंतप्रधान मोदी
  • गावागावात ऑप्टिकल फायबर पोहोचवण्यासाठी जो वेग 2013 मध्ये होता, तोच वेग जर कायम ठेवला असता, तर त्या कामासाठी अनेक पिढ्या गेल्या असत्या - पंतप्रधान मोदी
  • 2014 ला मतदारांनी केवळ सरकार बनवलं नाही. तर ते देश बनवण्यासाठी एकत्र आले आणि एकत्र येत राहतील-  पंतप्रधान मोदी
  • 2013 च्या वेगानं देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती- पंतप्रधान मोदी
  • बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान आमच्यासाठी मार्गदर्शक, गरिबांना न्याय मिळावा, दलित, आदिवासींना विकासाचा अधिकार संविधानाने दिला - पंतप्रधान मोदी
  • 2014 मध्ये देशाने केवळ सरकार बनवलं नाही तर देशवासियांनी देश बनवण्यात सहभाग घेतला. - पंतप्रधान मोदी
  • पुढील वर्षी जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या नरसंहारात शहीद झालेल्या प्रत्येक नागरिकाला विनम्र श्रद्धांजली- पंतप्रधान मोदी
  • या आदिवासी तरुणांनी तिरंग्याची शान वाढवली-  पंतप्रधान मोदी
  • चंद्रपूर मधल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी फत्ते केलेल्या एव्हरेस्ट मोहिमेचा उल्लेख
  • लाल किल्ल्यावरच्या भाषणात पंतप्रधानांकडून महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवीरांचा गौरव
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
लातुरात काँग्रेसकडून भाजपला 'दे धक्का'; संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांची मुलगी आघाडीवर
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Embed widget