PM Modi Turban : तिरंग्याचा फेटा, निळा रंगाचा कोट; लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मोदी कोणकोणत्या रंगात दिसले?
PM Modi Turban : 2014 पासून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त रंगीबेरंगी पगडी/फेटा परिधान करण्याची परंपरा नरेंद्र मोदींनी सुरु केली. जाणून घेऊया या नऊ वर्षात लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान मोदी कोणकोणत्या रंगातील कपड्यांमध्ये दिसले...
PM Narendra Modi Turban : आज देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असून देश अमृतमहोत्सव साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरुन (Red Fort) सलग नवव्यांदा ध्वजारोहण केलं आणि देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या लांबीसह त्यांनी परिधान केलेल्या कपडे आणि पगडी/फेट्याचीही कायम चर्चा आहे. 2014 साली पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला खास प्रकारची पगडी अथवा फेटा परिधान केला आहे. ती परंपरा यंदाच्या स्वातंत्र्यदिनालाही कायम राहिली. यावर्षी त्यांनी आपल्या फेट्याचा रंग आणि स्टाईल बदलली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय ध्वज असलेला पांढऱ्या रंगाचा फेटा परिधान केल्याचं पाहायला मिळालं. तसंच त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर निळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.
2014 पासून स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त रंगीबेरंगी पगडी/फेटा परिधान करण्याची परंपरा नरेंद्र मोदींनी सुरु केली. जाणून घेऊया या नऊ वर्षात लाल किल्ल्यावरुन भाषण देताना पंतप्रधान मोदी कोणकोणत्या रंगातील कपड्यांमध्ये दिसले...
2021 : मागील वर्षी म्हणजेच 2021मध्ये त्यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता, ज्याचा मागील भाग त्यांच्या गमछाच्या किनाऱ्याशी जुळता होता.
2020 : दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम आणि रंगाची पगडी परिधान केली होती. त्यावर्षी मोदींनी भगवी किनार असलेलं पाढरं उपरणंही परिधान केलं होतं.
2019 : वर्ष 2019 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर लाल किल्ल्यावरील संबोधनात पंतप्रधानांनी रंगीबेरंगी फेटा परिधान केला होता. लाल किल्ल्यावरील त्यांचं हे सहावं संबोधन होतं.
2018 : पंतप्रधानांनी 2018 मध्ये त्यांनी कुर्ता परिधान केला होता तर त्यांच्या पगडीचा रंग गडद केशरी आणि लाल होता.
2017 : पंतप्रधानांनी 2017 मध्ये हाफ स्लीव्हचा कुर्ता आणि चमकदार लाल-पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती
2016 : या वर्षी पंतप्रधान मोदी साध्या कुर्ता आणि चुडीदार पायजम्यात दिसले होते. यासोबतच त्यांनी लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाची राजस्थानी साफा परिधान केला होता.
2015 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये क्रीम कलरचा कुर्ता आणि खादी रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्यावेळी त्यांनी लाल आणि हिरव्या रंगाची पट्टी असलेली पगडी परिधान केली होती.
2014 : पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाला नरेंद्र मोदी यांनी भगवा आणि हिरव्या रंगाचा जोधपुरी बांधणीचा फेटा बांधला होता.