Independence Day 2022 Live : स्वातंत्र्यदिन चिरायू होवो! स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; देशभरात जल्लोष
Independence Day 2022 Celebration Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर जल्लोष, ठिकठिकाणी रॅली आणि पदयात्रा, सकाळी साडेसात वाजता पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यातून देशाला संबोधित करणार

Background
Independence Day 2022 Live Updates : आज 15 ऑगस्ट. अर्थात आपला स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022). 15 ऑगस्ट 1947 रोजी याच दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपला भारत 75 व्या अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने भारतात ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग नवव्यांदा देशाला संबोधन करणार आहेत. 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनामागचा इतिहास नेमका काय आहे हे या माध्यमातून जाणून घेऊयात.
स्वातंत्र्यदिनाचा इतिहास (Independence Day 2022 History) :
इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 19व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाबी आणि सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले.
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व (Independence Day 2022 Importance) :
भारताचा स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळला जातो कारण आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे.
या दिवशी संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली जाते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वज फडकविला जातो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहोरी गेटच्या वर भारतीय राष्ट्रध्वज उंचावला. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.
Independence Day 2022 : 60 बैलगाड्यांच्या फेरीसह हरिनामाचा गजर
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील भूतमुगळी गावात अगदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील बळीराजा सरसावल्याचं दिसून आलं. यावेळीू 60 बैलगाड्यांची फेरी काढत राष्ट्रध्वज हातात घेऊन गावभर हरिनामाचा गजर करण्यात आला.























