एक्स्प्लोर

Independence day 2022 : देशातील 'जल योद्धे', पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी झटणारे हात

India’s Water Warriors : आपल्यापैकी अनेकजण आहेत जे, पाण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना पाण्याचं महत्त्व पटवून देण्यात आणि पाणी वाचवण्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत.

India’s Water Warriors : पाणी (Water) म्हणजे, जीवन... जल है तो कल है... अशा अनेक गोष्टींमधून आपण पाण्याचं महत्त्व शिकलो. पाणी म्हणजे, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांप्रमाणेच पाणी हेदेखील आपल्या मुलभूत गरजांपैकी एक. पाणी जरी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा घटक असला तरी, आल्यापैकी अनेकांना त्याचं म्हणावं तेवढं महत्त्व पटलेलं दिसत नाही. मानव आपल्या अनेक कृत्त्यांतून पाणी प्रदूषित करतो. अनेकदा अनावश्यक पाण्याचा वापर करुन पाण्याची नासधूस केली जाते. अशातच आपल्यापैकी अनेकजण आहेत जे, पाण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोकांना पाण्याचं महत्त्व पटवून देण्यात आणि पाणी वाचवण्याचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करत आहेत. आपल्यातीलच एक असलेले हे सामान्य भारतीय 'जलयोद्धा' बनून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी झटत आहेत. जाणून घेऊया या जलयोध्यांबाबत... 

आबिद सुरती (Abid Surti)

आबिद सुरती... यांनी गेल्या दशकभरात जवळपास 20 दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली आहे. महाराष्ट्रातील हा 86 वर्षीय जलयोद्धा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी धडपडतोय. आबिद यांनी पाणी वाचवण्यासाठी 'ड्रॉप डेड' नावाचं फाऊंडेशनही स्थापन केलं आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरात आबिद सुरती दर रविवारी प्लंबरसोबत नियमितपणे प्रत्येक घरोघरी फिरतात. "तुमच्या घरातील कोणता नळ गळतोय का?", हा प्रश्न विचारुन घरातील गळणाऱ्या नळांची ते मोफत दुरुस्ती करुन देतात. एवढंच नाहीतर, जर एखाद्या घरात कोणताच नळ गळत नसेल, तर आबिद तिथून निघताना त्या घरातल्यांची माफी मागतात. 

आबिद सुरती यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेमुळे त्यांनी आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया जाण्यापासून वाचवलं आहे. आबिद यांच्या प्रेरणेनं इतर लोकांनीही त्यांच्या मोहिमेला महत्त्व दिलं आणि त्यांना साथ दिली. दिल्लीतील एका आमदारानं आपल्या मतदारसंघात सुरती यांचं मॉडेल स्वीकारण्याबाबत बोलले होते. वन मॅन आर्मीप्रमाणे काम करत आबिद आठवड्यातले 6 दिवस काम करतो आणि रविवारी लोकांमध्ये पाण्याबाबत जनजागृती करण्याचे काम करतो. 

अमला रुईया (Amla Ruia)

समाजसेविका अमला रुईया... जलमाता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमला यांनी आपल्या प्रयत्नांनी वाळवंट असलेल्या राजस्थानमधील तब्बल 100 गावांचं नशीब पालटलं आहे. अमला यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. पण सध्या त्या मुंबईत राहतात. अमला यांनी वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीमसह चेक डॅम बनवून राजस्थानातील 100 गावांचं चित्र बदललं. धरण बांधल्यानंतर दुष्काळी गावातील दोन लाख लोकांना पाणी मिळू लागलं. 

अमला रुईया यांनी घडवून आणलेल्या बदलामुळे ग्रामस्थांचं जीवन नव्या रुळावर आलं आहे. आज या सर्व गावांचं एकूण वार्षिक उत्पन्न 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमला यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं गावकरी म्हणतात. 1999-2000 मध्ये राजस्थानच्या दुष्काळग्रस्त गावांच्या बातम्या वाचून अमला तिथपर्यंत पोहोचल्या. आपल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीनं धरणं बांधली. 

आमला यांनी जलसंवर्धनासाठी धर्मादाय ट्रस्टची स्थापना केली. याद्वारे त्या पाणी, वनस्पती आणि मातीचं संवर्धन करण्यासोबतच शिक्षणाचा प्रसार करण्याचं कामही करतात. अमला यांना त्यांच्या योगदानासाठी 2016 मध्ये 'वुमन ऑफ वर्थ' सामाजिक पुरस्कार श्रेणीसाठी नामांकन मिळाले होते. 

नाम फाऊंडेशन (Naam Foundation)

215 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आणि दुष्काळी गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील 2015 यावर्षी आत्महत्या केलेल्या 230 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 15 हजारांचा धनादेश, ब्लॅंकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असं मदतीचे स्वरूप होतं. परंतु, फक्त काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचं ठरवलं. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता, शेतकऱ्यांना आमि त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देणं याकडे पण लक्ष देता यावं यासाठीसुद्धा या संस्थेची कल्पना पुढे आली. या कल्पनेचं रुपांतर नाम फाउंडेशन या संस्थेमध्ये झाले. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर 2015 मध्ये पुण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात संस्थेची नोंदणी केली. 

पाणी फाऊंडेशन (Paani Foundation)

पानी फाउंडेशन ही 2016 मध्ये ना-नफा तत्त्वावर स्थापन झालेली संस्था. अभिनेता आमीर खान आणि सत्यजीत भटकळ यांनी सुरु केलेल्या या संस्थेमुळं खऱ्या अर्थानं राज्यात जलक्रांती घडली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा, यासाठी सत्यमेव जयते या टीव्ही मालिकेच्या टीमनं पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच, या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेणं, त्यांना प्रोत्साहन देणं आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचं माध्यम पुरवणं, हे पानी फाउंडेशनचं लक्ष्य आहे. 

पानी फाउंडेशन सध्या जलसंधारणाबाबत प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील जवळपास 90 टक्के दुष्काळी भागांत पानी फाउंडेशनचं काम सुरू आहे. प्रशिक्षणात पाणलोट व्यवस्थापनाविषयी शिकलेली कौशल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी गावकऱ्यांना दिलेली प्रेरणा म्हणून 2016 यावर्षी 'सत्यमेव जयते वॉटर कप' या अनोखी स्पर्धा आयोजित केली होती. 2019 या वर्षातली वॉटर कप स्पर्धा 8 एप्रिल ते 27 मे या कालावधीत घेण्यात आली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
Embed widget