एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माजी मंत्री जनार्दन रेड्डींच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
बंगळुरु : माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या कार्यालयावर आणि घरावर आयकर विभागाने छापेमारी सुरु केली आहे. विशेष तपास पथक (एसआयटी) आणि आयकर विभागाने मारलेल्या एका छाप्यात महत्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे.
अवैधरित्या खाणकामप्रकरणी साडे तीन वर्षे तुरुंगवास भोगलेले भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांना मुलीचा शाही विवाह सोहळा अंगलट येण्याची चिन्हं आहेत. रेड्डी यांनी मुलीच्या लग्नासाठी तब्बल 500 कोटींची उधळण केली होती.
रेड्डींच्या मुलीच्या शाही विवाह सोहळ्याची देशभरात चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवरच आयकर विभागाने ही छापेमारी सुरु केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहिर केल्यानंतर अशा प्रकारे पैशांची उधळण केल्यानंतर सरकारलाही टीकेचा सामना करावा लागला. काँग्रेसने सभागृहात देखील हा मुद्दा उठवला होता.
दरम्यान रेड्डी यांच्या कंपनीवर आता आयकर विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी : मुलीच्या लग्नासाठी भाजपच्या माजी मंत्र्याची 500 कोटींची उधळण!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement