एक्स्प्लोर
टॅक्स भरला नाहीतर पॅनकार्ड होणार जप्त
मुंबई : कर चुकवेगिरी करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने आयकर विभागाने अशा नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईत दंडासोबतच पॅनकार्ड जप्त करणे आणि गॅस सबसिडी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या चालू आर्थिक वर्षापासून ही कारवाई करण्यात येणार आहे.
नुकत्याच आयकर विभागाच्या झालेल्या बैठकीत आयकर विभागाचा 'सेंट्रल अॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला. यावेळी कर चुकविणाऱ्यांवर कारवाईसाठी नव्या मार्गांचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, अशा कर चुकवेगिरांचा पॅन नंबर ब्लॉक करून गॅस सबसिडी रद्द करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. या शिवाय कर चुकवणाऱ्यांवर अन्य कारवाईद्वारे त्यांना बँकेकडून कर्जही मिळणे अवघड होणार आहे.
२०१३मध्ये कर चुकवेगिरांची संख्या १२.१९ लाख होती. तर २०१४ मध्ये कर चुकवेगिरांची संख्या २२.०९ लाख होती. मात्र, २०१५ मध्ये हिच संख्या वाढून ५८.९८ लाखांपर्यंत गेली होती.
या सर्व कर चुकवेगिरांना डिफॉल्टर ठरवून त्यांची एक यादी वित्त मंत्रालयाला देण्यात येणार आहे. या मार्फत या सर्वांच्या गॅस सबसिडी रद्द करण्याच्या सुचना देण्य़ात येणार आहेत. शिवाय या याद्या आयकर विभागाच्या सर्व विभागीय कार्यालायांनाही पाठवण्यात येणार आहेत.
यासोबतच यासाठी कायदेशीर प्रक्रियेचाही आधार घेण्यात येणार आहे. कर चुकवेगिरांवर कारवाईसाठी आयकर अधिनयम २७१ एफ आणि २७६ सीसीनुसार त्यांच्यावर खटला चलवण्यात येईल. शिवाय यांच्याकडून १००० ते ५००० दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच अशा कर चुकवेगिरांना दंड न भरल्यास तीन महिने ते सात वर्षांची कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement