एक्स्प्लोर
मुंबई-दिल्लीसह काही शहरांमध्ये आयकर विभागाचे छापे
नवी दिल्ली : पाचशे, हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता बेहिशेबी नोटा बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आयकर विभागानं छापे टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
मुंबई, दिल्ली आणि काही इतर शहरांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत कारवाई केली आहे. छाप्यांमध्ये आयकर विभागाला काय आढळलं याबाबतची माहिती तूर्तास उपलब्ध नाही.
एका व्यक्तीने अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम डिपॉझिट झाल्यास संबंधित बँकेला त्यासंदर्भात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवाय 10 लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी रक्कम सापडल्यास त्यावर बेहिशेबी मालमत्तेवर जितका कर भरावा लागेल तेवढी अधिकची रक्कम व त्यासोबत 200 टक्के दंडही भरावा लागेल.
मात्र जर तुम्ही इन्कम टॅक्समध्ये तुमचं उत्पन्न आधीच जाहीर केलं असेल आणि सध्याची बँकेत जमा करणारी रक्कम त्याच्याशी मिळती जुळती असेल, तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement