एक्स्प्लोर

'ट्रेनमध्ये चढता-उतरताना प्रवाशाचा मृत्यू झाल्यास रेल्वे भरपाई देणार'

ट्रेनमध्ये चढता-उतरताना एखादा प्रवासी जखमी किंवा मृत्युमुखी पडला, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये चढता-उतरताना एखाद्या प्रवाशाला प्राण गमवावे लागले, तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. प्रवाशाच्या निष्काळजीपणाचं कारण देत रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने सुनावलं. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना मिळणाऱ्या भरपाईबाबत देशभरातील विविध हायकोर्टांनी वेगवेगळे निकाल दिले होते. प्रवाशांची हलगर्जी अपघाताला कारणीभूत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळू शकत नाही, असं काही निकालांमध्ये म्हटलं होतं. तर काही प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने बिहारमधील प्रकरणाचा निकाल देताना हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. तिकीट नसलं तरी एखाद्या प्रवाशाला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. भरपाईचा दावा सिद्ध करण्यासाठी प्रवासासंदर्भातील अन्य पुरावे सादर करणे गरजेचे असतील. अपघात हा प्रवास सुरु असताना किंवा प्रवासानंतर ट्रेनमधून उतरतानाही होऊ शकतो. स्टेशन परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई द्यावी लागेलच, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. बिहारमधील करौता ते खुसरुपूर प्रवासादरम्यान 2002 मध्ये एका प्रवाशाचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला होता. संबंधित प्रवासी सेकंड क्लासमधून प्रवास करत होता. पतीच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी पत्नीने रेल्वे प्रशासनाकडे धाव घेतली होती. प्रवासी ट्रेनबाहेर लटकून प्रवास करत असल्याचं सांगून रेल्वे लवादाने प्रवाशाच्या पत्नीला भरपाई देण्यास नकार दिला होता. गर्दीमुळे संबंधित प्रवाशाला ट्रेनबाहेर लटकावं लागल्याचा युक्तिवादही फेटाळण्यात आला होता. पाटणा हायकोर्टाने महिलेला चार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. या निकालाविरोधात रेल्वे मंत्रालयाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायाधीश ए के गोयल आणि आर एफ नरिमन यांच्या खंडपीठासमोर रेल्वे मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने पाटणा हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत रेल्वे प्रशासनाला भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. फक्त आत्महत्या किंवा आजारपणामुळे ट्रेन प्रवासात होणारे मृत्यू अपवादात्मक असून अशा प्रकारांमध्ये भरपाई मिळणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
अनिल देसाई नरेश म्हस्केंच्या दिशेने धावले...; शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर जोरदार ड्रामा; नेमकं काय घडलं?
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Gadchiroli News: सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
गडचिरोलीमधील सर्पदंश मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट; मुख्याध्यापकसह अधीक्षक अन् अधिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Embed widget