Delhi Security : 26 जानेवारीला दिल्लीत मोठ्या घातपाताचा कट? गाझीपूर फूल मार्केटमधून IED आणि RDX जप्त
IED Found in Delhi : एनएसजीच्या टीमने मोकळ्या जागेत ही बॅग नेऊन एका खड्ड्यामध्ये बॉम्बचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला
IED Found in Delhi : दिल्लीतील गाझीपूर फूल मार्केट येथे एका बॅगमध्ये आयईडी बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वेळीच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला असून याप्रकरणी दिल्ली पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.गाझीपूर फुल बाजार येथे एक बेवारस बॅग असल्याची माहिती अकराच्या सुमारास प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने तिथे धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी तपास केला असता बॅगमध्ये आयईडी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गाझीपूरच्या भाजी मार्केटमध्ये 8 फूटाचा खोल खड्डा खोदण्यात आला. एनएसजीच्या टीमने मोकळ्या जागेत ही बॅग नेऊन एका खड्ड्यामध्ये बॉम्बचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी हा कंट्रोल ब्लास्ट करण्यात आला.
घटनास्थाळी एफएसएलच्या टीमला देखील बोलवण्यात आले. एफएसएलच्या टीमने कसून तपास केला असून पुरावे गोळा करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ दिल्लीत मोठे कटकारस्थान रचण्यात आले होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता होती.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीपूर फुल मंडईच्या गेट नंबर 1 वर हा बॉम्ब प्लांट करण्यात आला होता. ज्या ठिकाणी हा बॉम्ब ठेवण्यात आला होता तेखील मुख्यद्वाराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे. परंतु कॅमेराचा फोकस स्पॉटवर नाही. म्हणजे बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीने परिसराची रेकी केली होती. त्यानंतर त्याचा चेहरा कॅमेऱ्यात कैद होणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार बॅगमध्ये आयईडीबरोबर टायमर सेट करण्यात आला होता. गाझीपूर फुल मंडईच्या गेट क्रमांक एकमधून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये एक मोठा कॅमेरा लावण्यात आलेला आहे. ज्यामध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याचा चेहरा कैद झाल्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल याचा तपास करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात आजपासून पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; 'या' जागांवर चुरस
- भाजपला धक्का, आज 3 मंत्री आणि 6 आमदार होणार 'सायकल'वर स्वार, अखिलेश यांच्या उपस्थितीत प्रवेश
- ABP News C Voter Survey : कोरोना, मोदींचा चेहरा की योगींचं काम....निवडणुकीत कोणता मुद्दा ठरणार प्रभावी, पाहा काय म्हणतेय जनता