ABP Network Ideas of India : एकाच मंचावर विविध क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी; राजकारण, क्रीडा, मनोरंजनासह प्रत्येक विषयावर चर्चा
ABP Network Ideas of India : एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.
ABP Network Ideas of India Naya India 2023 : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे. आगामी निवडणुकांआधी या पार पडणाऱ्या समिटकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाची थीम 'नया इंडिया : लूकिंग इनवर्ड, रिचिंग आउट' (Naya India : Looking Inward, Reaching Out) ही आहे. यामध्ये उद्योजक (Business Icons), संस्कृती दूत (Cultural Ambassadors) आणि राजकारण्यांसोबत (Politicians) संवाद साधला जाणार आहे.
ABP Network Ideas Of India : 'आयडियाज ऑफ इंडिया'
गेल्या वर्षी एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' समिटला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एबीपी नेटवर्क प्रेक्षकांसाठी 'आयडियाज ऑफ इंडिया' या परिसंवादामध्ये नव्या विषयावर चर्चासत्र घेऊन येणार आहे. सध्या देश पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विविध मुद्दे समोर येत आहे.
पाहा व्हिडीओ : एक झलक : ABP Network Ideas of India 'नया इंडिया'
एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद
- युक्रेन आणि रशियाच्या युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल. अद्याप दोन्ही देशांमधील संघर्ष सुरुच आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन कठोर प्रतिकार आणि नुकसानीनंतरही मागे हटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
- चीनकडून कुरापती सुरुच आहेत. कोविड-19 महामारीतून अद्याप जग पूर्णपणे सावरलेलं नाही. अनेक शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणू चीनने तयार केल्याचा आरोप केला आहे.
- इराणमधील देशव्यापी हिजाब चळवळही चर्चेत आहे. इराणमध्ये देशाच्या हिजाब कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण देशात हिजाबविरोधी चळवळ वणव्यासारखी पसरली. हजारो नागरिक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी निदर्शनं करताना पाहायला मिळालं.
- दक्षिण आशियामध्ये आर्थिक अस्थिरता पाहायला आहे. अपुरे रोजगार आणि वाढती महागाई या मुख्य समस्या आहेत.
- तसेच, 2024 च्या लोकसभा निवडणुकीला आता फक्त एक वर्ष उरले असताना, जागतिक मंचावर या क्षणी भारत कुठे उभा आहे? नऊ राज्यांच्या निवडणुका, दक्षिण भारत, राजकीय परिस्थिती आणि सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करण्यासाठी अधीर असलेली नवीन पिढी यातील भारताची परिस्थिती, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होईल.
- सध्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे आणि 'मेक इन इंडिया'साठी देश विविध पाऊलं उचलत आहे. देशात जागतिक गुंतवणूक आणि स्थानिक उत्पादन आणि रोजगार मजबूत करणे, हे उद्दिष्ट आहे.
ABP Network Ideas of India : 'या' दिग्गजांची उपस्थिती
एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया'च्या यंदाच्या दुसऱ्या समिटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव, अभिनेत्री आशा पारेख आणि आयुषमान खुराना आणि लेखक अमिताव घोष आणि देवदत्त पट्टनाईक 'नया इंडिया' म्हणजे काय यावर चर्चा करणार आहेत.