कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोस अधिक परिणामकारक; ICMR च्या अभ्यासातून स्पष्ट
Covaxin and Covishield : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींचे मिक्स डोस घेतल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं ICMR च्या ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालंय.

नवी दिल्ली : कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असून त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली होते असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) ताज्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेऊ नका असं या आधी सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं. आता ICMR च्या ताज्या अभ्यासानुसार, या दोन लसींचे 'मिक्सिंग अॅन्ड मॅचिंग' अधिक चांगला परिणाम दाखवतात असं सांगण्यात येत आहे.
महत्वाचं म्हणजे दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणं हे अधिक सुरक्षित असल्याचंही आयसीएमआरने आपल्या या अभ्यासात सांगितलं आहे. या आधी देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये लसीचा तूटवडा निर्माण झाला असताना उपलब्ध असलेल्या दुसऱ्या कंपनीची लस घेता येईल का अशी चाचपणी सुरु होती. पण त्यावेळी दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेऊ नका, त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते असं सरकारकडून आवाहन करण्यात आलं होतं.
Study on mixing & matching of COVID vaccines, Covaxin&Covishield shows better result: ICMR
— ANI (@ANI) August 8, 2021
Immunization with combination of an adenovirus vector platform-based vaccine followed by inactivated whole virus vaccine was not only safe but also elicited better immunogenicity: Study pic.twitter.com/wDVZ6Q2TvU
आता आयसीएमआरच्या या ताज्या अभ्यासामुळे दोन वेगवेगळ्या लसी एकत्रित वापरता येतील असं दिसून आलं आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींचे प्रत्येकी एक डोस घेतले असता ते अधिक सुरक्षित आहेत आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीत अधिक वाढ होईल असं सांगण्यात आलं आहे.
त्या आधी एका अभ्यासातून आयसीएमआरने सांगितलं होतं की, कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
जॉनसन अँड जॉनसनच्या सिंगल डोसला मंजुरी
भारताने आपली लस बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-डोस कोविड -19 लसीला भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे 5 EUA लस उपलब्ध आहे. यामुळे आपल्या देशात कोविडविरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळेल.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
