एक्स्प्लोर
केदारनाथमध्ये वायूसेनेचं हेलिकॉप्टर कोसळलं
हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे.

देहरादून: उत्तराखंडमधील केदारनाथजवळ वायूसेनेचं एमआय 17 हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत दोन पायलटसह चार जण जखमी झाले आहेत.
हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीवरुन साहित्य घेऊन केदारनाथकडे जात होतं. मात्र त्याचवेळी ते दुर्घटनाग्रस्त झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरमध्ये 6 जण होते. यापैकी एका पायलटला हलकी तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
हेलिपॅडपासून अवघ्या 60 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर क्रॅश झालं.
यापूर्वी केदारनाथ आपत्तीवेळी 2013 मध्ये इथे MI-17 हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. त्यावेळी 8 जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर 18 मे 2017 रोजी केदारनाथमध्ये इंडोकॉप्टर कंपनीचं हेलिकॉप्टर हेलीपॅडवर रुतलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























