एक्स्प्लोर
Advertisement
रेल्वे अपघातामुळे सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी
आठवडाभरात रेल्वेचे दोन अपघात झाल्याने, नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.
नवी दिल्ली: आठवडाभरात रेल्वेचे दोन अपघात झाल्याने, नैतिक जबाबदारी स्वीकारुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केला. मात्र पंतप्रधानांनी तूर्तास राजीनामा स्वीकारला नाही.
उत्तर प्रदेशात एका आठवड्यात सलग दोन मोठे रेल्वे अपघात झाले. आज कैफियत एक्स्प्रेसच्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले, तर रविवारी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरुन 22 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.
या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राजीनाम्याची तयारी दर्शवली. मात्र पंतप्रधानांनी राजीनामा स्वीकारला नाही.
https://twitter.com/sureshpprabhu/status/900284055173951488
https://twitter.com/sureshpprabhu/status/900283837548306433
तत्पूर्वी आजच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के. मित्तल यांनीही राजीनामा दिला आहे.
एकाच आठवड्यात उत्तर प्रदेशात झालेले रेल्वेचे दोन अपघात यामुळे त्यांनी आपलं पद सोडलं आहे. कार्यक्षम अधिकारी अशी ए.के. मित्तल यांची ओळख आहे. म्हणूनच दोन वर्षांपूर्वी त्यांचा कार्यकाळ संपूनही त्यांच्याकडेच अध्यक्षदाची जबाबदारी दिली गेली.
दोन रेल्वे दुर्घटनांनंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष एके मित्तल यांचा राजीनामा
कार्यकाळ संपल्यानंतरही पुन्हा त्याच व्यक्तीकडे कार्यभार सोपवण्याची रेल्वेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ होती. मात्र आज ए.के.मित्तल यांनी रेल्वे मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
उत्कल एक्स्प्रेस आणि कैफियत एक्स्प्रेसचे अपघात
उत्तरप्रदेशात एका आठवड्यात सलग दुसरा मोठा रेल्वे अपघात झाल. दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेस डंपरला धडकली. यामुळे रेल्वे इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले यामध्ये तब्बल 74 जण जखमी झाले आहेत.
उत्कल एक्स्प्रेसला अपघात
रविवारी उत्कल एक्स्प्रेसचे 13 डबे रुळावरुन घसरुन 22 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात उत्तर प्रदेशातच कैफियत एक्स्प्रेसचे डबे घसरले. यानंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष आदित्य कुमार मित्तल यांनी राजीनामा दिला.
संबंधित बातम्या
उत्तरप्रदेशात पुन्हा रेल्वे दुर्घटना, कैफियत एक्स्प्रेस घसरली
दोन रेल्वे दुर्घटनांनंतर रेल्वे बोर्ड अध्यक्ष एके मित्तल यांचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement