हिंमतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, गडकरींचं राहुल गांधींना उत्तर
"नितीन गडकरी एकमेव भाजप नेते आहेत, ज्यांनी खरं बोलण्याची हिंमत दाखवली आहे," असं ट्वीट करत राहुल गांधींनी गडकरींचं अभिनंदन केलं होतं.
केवळ नितीन गडकरींनी खरं बोलण्याची हिम्मत केली : राहुल गांधी राफेलवर काय म्हणाले? "तुम्हाला हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत, यातच मोदीजी आणि आमच्या सरकारचं यश आहे. राहिला मुद्दा तुम्ही उचललेल्या मुद्द्यांचा, तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की, राफेलमध्ये आमच्या सरकारने देशाचं हित समोर ठेवून सर्वात पारदर्शक व्यवहार केला आहे," असं गडकरी पुढे म्हणाले.@RahulGandhi जी, मेरी हिम्मत के लिए मुझे आप के सर्टिफिकेट की जरूरत नही है लेकिन आश्चर्य इस बात का है की एक राष्ट्रीय पार्टी के अध्यक्ष होने बाद भी हमारी सरकार पर हमला करने के लिए आपको मीडिया द्वारा ट्विस्ट किए गए खबरों का सहारा लेना पड़ रहा है।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 4, 2019
काँग्रेसच्या धोरणांवर भाष्य शेतकऱ्यांवरील संकटाविषयी नितीन गडकरी म्हणाले की, "तुमच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना ज्या परिस्थितीत ढकललं, तिथून त्यांना बाहेर काढण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न मोदीजी करत आहेत आणि आम्हाला यात यशही मिळत आहे. तुमच्यासह काही जणांना मोदी पंतप्रधान झालेलं सहन होत नाही. त्यामुळे तुम्हाला असहिष्णुता आणि घटनात्मक संस्थांवर हल्ला करण्याचं स्वप्न पडतं."यही मोदी जी और हमारे सरकार की कामयाबी है की आप को हमला करने के लिए कंधे ढूंढने पड़ रहे है।
रही बात आपके उठाए गए मुद्दों की तो मैं डंके की चोट पर कहता हूं की राफेल में हमारी सरकार ने देश हित सामने रख कर सबसे पारदर्शक व्यवहार किया है। — Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 4, 2019
जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही : नितीन गडकरी संस्थांवर हल्ला संस्थांवरील हल्ल्याबाबतच्या मुद्द्यावर गडकरी म्हणाले की, "आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हाच फरक आहे की, आम्ही लोकशाही आणि घटनात्मक संस्थांवर विश्वास ठेवलं. तुमची ही खेळी काम करत नाही. मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनतील आणि आम्ही मजबुतीने देशाला विकासाच्या शिखरावर पोहोचवू. पण तुम्ही भविष्यात समजूतदारपणे आणि जबाबदारीने वागाल अशी आशा आहे."आपके नीतियों ने किसानों को जिस बदतर स्थिति में खड़ा किया उससे उनको बाहर निकालने की ईमानदार कोशिश मोदीजी कर रहे हैं और हम इसमें कामयाब भी हो रहे है। आप समेत कुछ लोगों को मोदीजी का प्रधानमंत्री बनना सहन नहीं हो रहा इसलिए आपको असहिष्णुता व संवैधानिक संस्थाओं पर हमले का सपना आता है।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 4, 2019
राहुल गांधींचं नवं ट्वीट नितीन गडकरी यांच्या या ट्वीटनंतर काँग्रेस अध्यक्षांनी आणखी एक ट्वीट करुन गडकरींना उत्तर देण्याची विनंती केली. राहुल गांधींनी त्यांच्या आधीच्या ट्वीटला कोट करत नवं ट्वीट केलं. उप्स, गडकरीजी, माफ करा, मी सर्वात महत्त्वाचा मुद्दा विसरलोच.... नोकरी! नोकरी! नोकरी! नोकरी!हमारे और काँग्रेस के डीएनए में यही अंतर है की हम लोकतंत्र और संवैधानिक सस्थाओं पर विश्वास करते है।आपके ये पैंतरे चल नहीं रहे। मोदीजी फिर प्रधानमंत्री बनेंगे और हम मजबूती के साथ देश को आगे बढ़ाएंगे।लेकिन,आप भविष्य में समझदारी और जिम्मेदारी के साथ बर्ताव करेंगे यह उम्मीद करता हूं
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 4, 2019
Oops, Gadkari Ji.
Huge apology. I forgot the most important one.... JOBS! JOBS! JOBS! JOBS! https://t.co/SfOLiCUoyg — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2019