एक्स्प्लोर

हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणी चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, लोकांमध्ये संताप

हैदराबाद बलात्कार आणि हत्याकांडप्रकरणातील चारही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हैदराबाद : येथील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांनी चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने चारही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कडक पोलीस बंदोबस्तात आज या आरोपींना शादनगर पोलीस ठाण्याहून चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. या चारही तरुणांवर सामुहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा मुलगा आणि मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले की, या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालणार आहे. याप्रकरणी न्यायालयाने चारही आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असे देशभरातील सर्वसामान्यांचे मत आहे. परंतु न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावल्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर डॉक्टर तरुणी ही हैदराबादमधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात काम करत होती. ती नेहमीप्रमाणे तिचं रुग्णालयातलं आपलं काम संपवून घरी निघाली होती. रस्त्यात तिची दुचाकी पंक्चर झाली. त्यानंतर तिला एका व्यक्तिने गॅरेजपर्यंत लिफ्ट दिली, तसेच तिला सांगितले की, जवळच्याच गॅरेजमध्ये गाडी दुरुस्त करुन देतो. तो तिला गॅरेजजळ घेऊन गेला. गॅरेजजवळ खूप ट्रक ड्रायव्हर्स होते. तिने बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितले की, "काही लोकांनी तिची गाडी ताब्यात घेतली आहे. आम्ही पंक्चर काढून देऊ चल असं तिला म्हणत आहेत, मला टेन्शन आलंय.." एवढं बोलून होईपर्यंत तिचा फोन कट झाला. फोन कट झाल्यामुळे तिची बहीण घाबरली. तिने आणि तिच्या काही नातेवाईकांनी पीडित तरुणीची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा पूर्णपणे जळलेला मृतदेह मिळाला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. नराधमांनी तिचा मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जाळला की तिची ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली. पोलिसांनी सांगितले की, सदर तरुणीचा मृतदेह हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर एका पुलाजवळ सापडला. ज्या टोल प्लाझावर ती शेवटची दिसली होती, तिथून हा पूल 25 किलोमीटर दूर आहे. (टोल प्लाझाजवळच गॅरेज आहे, तिथेच तिची गाडी दुरुस्त करुन देतो, असे आरोपींनी तिला सांगितले होते.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha KesakarABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  3 PM : 27 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
पोलिसाचं रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
महायुती सरकार राज्यातील वाघांची नसबंदी करणार? मोदी सरकारकडे पाठवणार प्रस्ताव, वनमंत्री नाईकांची माहिती  
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिल्याचा ठपका, नितीनकुमार देवरे निलंबित, आता तहसीलदार संघटनेची शासनाकडे मोठी मागणी
Embed widget