Hyderabad Fire : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; 11 मजुरांचा मृत्यू, 12 जण अडकल्याची भीती
Hyderabad Fire Update : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
Hyderabad Fire Update : हैदराबादमधील भोईगुडा आडी येथील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मजूर गोदामात झोपले होते. भीषण आग लागल्यामुळे एक भिंत कोसळली, त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या एक जणाला बचावण्यात आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आग इतकी भीषण होती की ती आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले. आग विझवण्यात आली आहे, मात्र काही जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रद्दी गोदामात काम करणारे सर्व मजूर बिहारचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहाटे तीन वाजता लागली आग
या घटना पहाटे तीन वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोदामाच्या पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. तळमजल्यावर अचानक आग लागली आणि झोपलेल्या लोकांना बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग बंद झाला. सध्या 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोदामातील फायबर केबलला आग लागल्याने धुराचे लोट पसरल्याचे पोलिसांनी सांगितले. गोदामात दारूच्या रिकाम्या बाटल्या, कागद, प्लॅस्टिक आणि इतर केबल्स इ. वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Martyrs Day 2022 : शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन; का साजरा करतात 'हा' दिवस?
- Petrol Diesel Price Hike : सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ, पेट्रोल-डिझेल प्रत्येकी 83 पैशांनी महागलं
- Viral Video : चहाप्रेमींनो 'हा' 'फ्रुट टी' प्यायलात का? सुरतमध्ये मिळतोय सफरचंद, केळी आणि चिकूचा चहा; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha