एक्स्प्लोर

Hyderabad Encounter Case: हैदराबाद एन्काउंटर बनावट, पोलिसांना दोषी ठरवत न्यायालयाकडून कारवाईचे आदेश 

Hyderabad Encounter : हैदराबादमध्ये 26 नोव्हेंबर 2019 च्या रात्री 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 6 डिसेंबर 2019 रोजी पोलिसांनी चार संशयित आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते.

Hyderabad Encounter Case : हैदराबादमध्ये 2019 मध्ये बलात्कार प्रकरणातील चार संशयित आरोपींचा एन्काउंटर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या आयोगाने बनावट असल्याचे म्हटले आहे. आयोगाने यासाठी काही पोलिसांवर ठपका ठेवला आहे. याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात पाठवले आहे.

26 नोव्हेंबर 2019 च्या रात्री हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर हैदराबादसह संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर 6 डिसेंबर 2019  रोजी पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयित आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते. परंतु, मृत संशयितांच्या कुटंबीयांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे काही दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्हीएस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली या चकमक प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी आयोग स्थापन केला होता.

जानेवारी 2022 मध्ये आयोगाने सर्वोच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज या प्रकरणी सुनावणी केली. तेलंगणा सरकारतर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी हा अहवाल गोपनीय ठेवण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावत हा अलवाल सार्वजनिक करण्याचे आहे दिले आहेत.   

"या प्रकरणी गुप्तता पाळण्याचे कोणतेही कारण नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी झाली असून यामध्ये काही लोक दोषी आढळले आहेत. राज्य सरकारने आता चौकशी अहवालाच्या आधारे दौषींवर कारवाई करावी,  असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 

दरम्यान, या प्रकरणानंतर न्यायमूर्ती सिरपूरकर आयोगाला काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, कोरोनामुळे या अहवाल पूर्ण करण्यास वेळ झाला. अखेर जानेवारी 2022 मध्ये आयोगाने हा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Abhijeet Dipke: झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
झारखंडच्या रांचीमध्ये 12 दिवसांपासून विद्यार्थ्यांचा एल्गार; विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणारी सीजेपी आंदोलनात कधी जाणार? अभिजीत दीपके म्हणाले.....
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई

Embed widget