(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रेमाचे अनोखे उदाहरण! दिवगंत पत्नीच्या स्मरणार्थ पतीने घरात बांधले मंदिर
जवळपास 30 वर्ष सुरू असलेल्या संसाराचा गाडा ओढण्यात मोलाची साथ देणाऱ्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत पतीने मंदिर उभारले आहे.
Husband build wife temple at home : आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत पतीने पत्नीचे मंदिर उभारले आहे. आपल्या पत्नीने सहजीवनाचा प्रवास अर्ध्यावर सोडल्याचा धक्का पतीला बसला. मात्र, तिच्या निधनानंतरही तिची सोबत कायम असावी म्हणून पतीने तिच्या स्मरणार्थ मंदिर उभारले आहे. बेळगावमधील शिवा चौगुले यांनी हे मंदिर उभारले आहे. बेळगाव येथील गँगवाडी येथील माजी नगरसेविका मैनाबाई चौगुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पती शिवा चौगुले यांनी उभारलेल्या मंदिराची सध्या चर्चा सुरू आहे.
पत्नीच्या अकाली निधनामुळे पती शिवा चौगुले यांना धक्का बसला. सहजीवनात पत्नीने 30 वर्षे साथ दिली होती. मात्र, आजारामुळे तिचे निधन झाल्यामुळे शिवा चौगुले यांना एकाकी पडल्यासारखे झाले. शिवा चौगुले यांची पत्नी मैनाबाई चौगुले या मूळच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगलेमधील होत्या. विवाहानंतर त्या बेळगावात आल्या. त्यांचे पती शिवा चौगुले हे समाजसेवक आणि गरजूंना मदत करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी महापालिका निवडणुकीत पत्नी मैना चौगुले यांना उभे केले. निवडणुकीत त्यांचा विजय झाला. नगरसेविका म्हणून त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे राबवली.
अनेक मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देखील कोणताही गाजावाजा न करता केली. त्यामुळे मैनाबाई यांच्या अकाली निधनामुळे केवळ घराच्या मंडळींना नव्हे तर प्रभागातील जनतेला देखील धक्का बसला. पत्नीच्या निधनानंतर ती सदैव आपल्या सोबत आहे, या भावनेतून शिवा चौगुले यांनी आपल्या पत्नीची मूर्ती करून मंदिर उभारण्याचे ठरवले.
बेळगावातील मुर्तीकाराने तयार केलेली ही मूर्ती वाजतगाजत घरी आणली. घरात मंदिर उभारले असून दररोज सकाळी मूर्तीची पूजा करून हार घालून तिची आरती शिवा करतात. सायंकाळी देखील दिवाबत्ती करून आरती करण्यात येते. गोरगरीब जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी आणि गरीब मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून मैना चौगुले सदैव प्रयत्नशील होत्या. त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवा चौगुले यांनी हॉस्पिटल आणि शाळा भविष्यात सुरू करण्याची योजना आखली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
'सध्याची वेळ अनुकूल नाही, रद्द झालेला कृषी कायदा पुन्हा लागू होईल'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha