एक्स्प्लोर
Advertisement
Insurance Policy Portability : मोबाईल सिमकार्डप्रमाणे इन्श्युरन्स पॉलिसीही पोर्ट करा
आपल्याला आवडणाऱ्या स्किम्स आणि सुविधा मिळाल्या नाहीत, नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर आपण मोबाईल सिम कार्ड पोर्ट करतो. त्याचप्रमाणे आता इन्श्युरन्स पॉलिसीदेखील (विमा) पोर्ट करता येणार आहे.
नवी दिल्ली : आपल्याला आवडणाऱ्या स्किम्स आणि सुविधा मिळाल्या नाहीत, नेटवर्कमध्ये अडथळे येत असतील तर आपण मोबाईल सिम कार्ड पोर्ट करतो. त्याचप्रमाणे आता इन्श्युरन्स पॉलिसीदेखील (विमा) पोर्ट करता येणार आहे.
गेल्या काही वर्षात सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. प्रत्येक कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहेत. मग ती मोबाईल ऑपरेटर कंपनी असो, डीटीएच कंपनी असो अथवा विमा कंपनी असो. जर तुम्हाला कंपनीने दिलेल्या सुविधा आवडत नसतील तर आयुष्यभर त्याच कंपन्यांची सेवा घेण्याची गरज नाही. ग्राहकांसाठी आता पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध आहे.
विमा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे की, जर विमा ग्राहक सध्या वापरत असलेल्या कंपनीच्या सेवा आणि पॉलिसी फीचर्सने समाधानी नसतील, तर ते ग्राहक हेल्थ पॉलिसी अन्य कोणत्याही कंपनीमध्ये पोर्ट करता येऊ शकते. 2011 साली भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्याबद्दलची प्रक्रिया लोकांना माहीत नसल्यामुळे या सेवेचा लाभ घेता आला नाही.
इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
कोणत्याही ग्राहकाला त्याची इन्श्युरन्स पॉलिसी पोर्ट करायची असेल, तर त्याला त्याच्या मूळ पॉलिसीच्या एक्सपायरी डेटच्या कमीत कमी 45-60 दिवस अगोदर नव्या इन्श्युरन्स पॉलिसीसोबत संपर्क करावा लागेल. त्यानंतर ग्राहकाला एक प्रपोजल अर्ज भरावा लागेल. नवी इन्श्युरन्स कंपनी जुन्या इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क करुन मेडिकल आणि क्लेम हिस्ट्रीची पडताळणी करेल. नव्या इन्श्युरन्स कंपनीला आवश्यक ती सर्व माहिती आणि कागदपत्र मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत आपली पॉलिसी स्वीकारावी लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement