एक्स्प्लोर
Advertisement
कशी ठरली राजू शेट्टी आणि राहुल गांधींची अचानक भेट?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या निवासस्थानी राजू शेट्टींची भेट झाली.
नवी दिल्ली : 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपप्रणित आघाडीत सहभागी झालेले राजू शेट्टी 2019 ला मात्र पुन्हा यूपीएसोबत दिसणार आहेत. राजू शेट्टी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत आज दुपारी राहुल यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. साधारण 15 ते 20 मिनिटे ही चर्चा झाल्यानंतर शेट्टी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्यालयात येऊन मोहन प्रकाश, अशोक चव्हाण यांच्यासोबतच पत्रकारांशी संवाद साधला.
कशी ठरली राजू शेट्टी आणि राहुल गांधींची अचानक भेट?
या भेटीबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले की, 'कर्जमाफी असेल किंवा हमीभावाचा मुद्दा शेतकऱ्यांची परिस्थिती देशात स्फोटक बनत चाललेली आहे. सरकार मात्र संवेदनशीलता दाखवायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या हिताबाबत आमचा पक्ष आणि राजू शेट्टी हे समविचारी आहोत. त्यामुळे का नाही आपण एकत्र काम करायचं असा विचार मी शेट्टींना बोलून दाखवला. त्यानंतर या भेटीच्या प्रक्रियेला वेग आला. शेट्टींशी प्राथमिक चर्चा झाली होती, त्यानंतर राहुल गांधींच्या कानावर हा विषय घातल्यावर त्यांनी तातडीनं घेऊन यायला सांगितलं आणि दुपारी दोन वाजताची वेळ उपलब्ध करुन दिली.
कालच काँग्रेसच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात कृषीविषयक ठराव मंजूर झाला. त्यात काँग्रेस शेतकऱ्यांना प्राधान्य देत असल्याचं लक्षात आल्यानंतरच राजू शेट्टींनी हा निर्णय घेतल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
राजू शेट्टींचं आमंत्रण राहुल गांधींकडून मान्य
'एनडीएसोबतचे संबंध मी आधीच तोडून टाकलेले आहेत, आजच्या या भेटीनंतर वेगळी राजकीय वाट चोखाळण्याचा पर्याय निश्चित माझ्यासमोर आहे' असं शेट्टी यांनी म्हटलं. विशेष म्हणजे 29 मार्चला देशभरातल्या 179 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचं एक संमेलन दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणार आहे. त्यासाठी शेट्टींनी दिलेलं आमंत्रण राहुल गांधींनी तत्वत: मान्यही केलं आहे. या माध्यमातून काँग्रेस शेतकऱ्यांच्या अधिक जवळ पोहचण्याचा प्रयत्न करतेय असं म्हणायला हरकत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement