एक्स्प्लोर

Cigarette Use Harming the Planet : सिगारेटच्या धुराने पृथ्वीचा श्वास कोंडतोय ! 'धुरांच्या रेषा हवेत काढी' आजच सोडून द्या !!

तंबाखूजन्य उत्पादनांमुळे 6 लाख 80 हजार 388 टन वार्षिक कचरा निर्माण होत आहे, तर सिगारेटच्या बटपासून (Cigarette Use Harming the Planet) निर्माण होणारा कचरा वार्षिक 9 लाख 7 हजार 184 टन आहे.

Cigarette Use Harming the Planet : सिगारेटचा झुरका शरीरासाठी कितीही घातक आहे म्हणून सांगितले, तरी धुर काढणाऱ्यांवर काहीही फरक पडलेला नाही. सिगारेटच्या धुराने फक्त  शरीराची हानी होत नसून पृथ्वीचाही श्वास कोंडू लागला आहे. सिगारेट पर्यावरणाला हानी कशा पद्धतीने पोहोचवत आहे हे समजून घेऊया. 

सिगारेटच्या बटमुळे पर्यावरणाला धोका

सिगारेट ओढून झाल्यानंतर जी बट फेकून देण्यात येते त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वर्षाला फेकून दिलेल्या तब्बल 4.5 ट्रिलियन (4 लाख 50 हजार कोटी) सिगारेटचे बट दरवर्षी पर्यावरण प्रदूषित करत आहेत. टाकून दिलेली सिगारेट बट जंगलातील आग आणि त्यापासून होणारे मृत्यू एक महत्त्वाचे कारण आहे. तंबाखूजन्य उत्पादनांमुळे 6 लाख 80 हजार 388 टन वार्षिक कचरा निर्माण होत आहे, तर सिगारेटच्या बटपासून निर्माण होणारा कचरा वार्षिक 9 लाख 7 हजार 184 टन आहे, तर 65 टक्के धूम्रपान करणारे सिगारेटचे बट अयोग्य पद्धतीने टाकून रिकामे होतात. 

तंबाखू उत्पादनाचा कचरा हा सर्व गोळा केलेल्या कचऱ्याच्या आणि कचऱ्यांमध्ये सातत्याने सर्वाधिक आहे. जागतिक कचऱ्यापैकी किमान 25 ते 40 टक्के कचरा तंबाखू उत्पादनांचा असल्याने हा पर्यावरणासाठी मोठा धोका आहे

किती सिगारेट वर्षाला उत्पादित होतात ?

दरवर्षी अंदाजे 6 ट्रिलियन म्हणजेच 6 लाख कोटी सिगारेट तयार होतात. कागद, शाई, सेलोफेन, फॉइल आणि गोंद यापासून बनवलेल्या सुमारे 300 अब्ज म्हणजेच 30 हजार 000 कोटी पॅकेजमध्ये हे विकले जाते.गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये तंबाखू उत्पादनांच्या वितरणासाठी आणि पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या कार्टन आणि बॉक्समधील कचऱ्याने 20 लाख टन कचरा निर्माण केला. साध्या भाषेत सांगायचं झाल्यास हे 9 हजार 433 मालवाहू गाड्यांच्या वजनाइतके आहे. 

तंबाखूच्या धुरात रसायने सु्द्धा तयार होत आहेत. तंबाखूच्या धुरात 7 हजारहून अधिक रसायने आढळून आली आहेत. त्यामधील 70 रसायने अशी आहेत जी मनुष्य आणि प्राण्यांच्या कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत.

एका सिगारेटसाठी किती पाणी वापरले जाते ?

एक सिगारेट बनवण्यासाठी जवळपास 3.7 लिटर पाणी वापरले जाते.

तंबाखू उत्पादनांसाठी किती पाणी वापरले जाते ?

जागतिक स्तरावर तंबाखू उत्पादनात 22 अब्ज टन म्हणजेच 2 हजार 200 टन पाणी तंबाखू उत्पादनात वापरले जाते. तुलना करायची झाल्यास हे पाणी 1.5 कोटी ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावांच्या बरोबरीचे आहे. जगातील सर्वात मोठी नदी असलेल्या अॅमेझॉन नदीतून एका दिवसात सोडण्यात येणाऱ्या पाण्याएवढे हे पाणी आहे. 

तंबाखूचा वापर आणि पाण्याचे गणित 

टोमॅटो किंवा बटाट्यांपेक्षा तंबाखूला आठ पट जास्त पाणी लागते. प्रत्येक किलोमागे तंबाखूचे उत्पादन, सेवन आणि विल्हेवाट लावली नाही, तर एका व्यक्तीची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची गरज पूर्ण होऊ शकते.

1 किलो तंबाखूच्या लागवडीसाठी लागणारे पाणी 

1 किलो तंबाखूच्या लागवडीसाठी 678 लिटर पाणी लागते. मानक बाथ टबमध्ये 302 लिटर असतेस, म्हणजेच सव्वा दोन बाथ टब एक किलो तंबाखू निर्मितीसाठी लागते. 

सिगारेट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांची संख्या

300 सिगारेट बनवण्यासाठी अंदाजे एका झाडाची गरज असते, तर एकूण जंगलतोडीसाठी 5 टक्के तंबाखू शेतीचा वाटा आहे. तंबाखू शेतीसाठी जमीन मोकळी केली जाते. दरवर्षी 2 लाख हेक्टर जमीन तंबाखू शेतीसाठी साफ केली जाते. इतकंच नाही, तर तंबाखूमुळे दरवर्षी वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जातो, तर 84 मेगाटन कार्बन डाय-ऑक्साईड सोडला जातो. प्रत्येक सिगारेटमधून संपूर्ण जीवनचक्रात अंदाजे 14 ग्रॅम CO2 उत्सर्जित होतो

तंबाखू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आरोग्याची हानी

तंबाखूची लागवड करणारा आणि कापणी करणारा तंबाखू उत्पादक शेतकरी ५० सिगारेटमध्ये जितके निकोटीन शोषून घेतो तितके निकोटीन शोषून घेतो.

पर्यावरण कर

काही देश आणि शहरांनी तंबाखू उत्पादनांवर पर्यावरण कर आकारणी केली आहे. युरोपियन युनियनने तंबाखू उत्पादनासारख्या विशिष्ट उत्पादनामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाच्या प्रमाणात आधारित कार्बन-केंद्रित उत्पादनांवर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. सॅन फ्रान्सिस्कोने 2010 मध्ये सिगारेट कचरा म्हणजेच सिगारेटचे बट आणि प्लास्टिक पॅकेजिंग साफ करण्यासाठी शुल्क लागू केले.

Source: WHO report on Tobacco : poisoning our planet

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget