एक्स्प्लोर
Advertisement
आकडेवारी : कर्नाटकात कोण आणि कसं सरकार स्थापन करणार?
कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही.
बंगळुरु : विधानसभा निवडणूक निकालानंतर कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कारण, भाजप आणि काँग्रेस-जेडीएस दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने कर्नाटकात मोठा पेच निर्माण झाला आहे. बहुमताचा 112 आकडा कोणालाही गाठता आला नाही.
कुणाला किती जागा?
कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झालं होतं.
यामध्ये भाजपने सर्वाधिक 104 जागा मिळवल्या आहेत. तर काँग्रेसला एकूण 78 आणि जेडीएस 38 जागा मिळाल्या आहेत. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.
भाजपसमोर पर्याय काय?
भाजपकडे स्वतःचे 104 आमदार आहेत. जर अपक्ष, केपीजेपी आणि बसपाचा एक आमदार सोबत आला, तर हा आकडा 107 होईल. मात्र तरीही भाजपकडे 112 हा आकडा गाठण्यासाठी जागा कमी पडतील. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या सात लिंगायत आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. काँग्रेसच्या सात आमदारांनी पाठिंबा दिल्यास एकूण आकडा 114 होईल. मात्र भाजपचा हा दावा Anti-defection law च्या विरोधात आहे.
या परिस्थितीमध्ये सभागृहात अविश्वास ठराव पास करायचा असेल, तर काँग्रेसच्या त्या सात आमदारांना गैरहजर रहावं लागेल, किंवा राजीनामा द्यावा लागेल. तेव्हा विधानसभेत 215 आमदार उरतील. यानंतर बहुमताचा आकडाही घटून 108 वर येईल. मात्र तरीही भाजपला एक आमदार कमी पडणार आहे.
काँग्रेस-जेडीएसचं सरकार कसं स्थापन होईल?
कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसला 78 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत समर्थनाची घोषण केली. त्यामुळे काँग्रेसचे 78 आणि जेडीएसच्या 38 जागा मिळून आकडा 116 होत आहे, जो बहुमतापेक्षा चारने जास्त आहे.
जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, तर ते दुसऱ्यांदा जागा कमी असतानाही मुख्यमंत्री होतील. यापूर्वी 2004 सालीही जेडीएसला 58 जागा मिळाल्या होत्या. मात्र भाजपच्या समर्थनामुळे कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते.
नियम काय सांगतो?
राज्यपाल अगोदर सरकार स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण देतात. मात्र गोवा आणि मणिपूरमध्ये राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला निमंत्रण दिलं होतं. या दोन्हीही ठिकाणी निमंत्रण मिळणाऱ्या पक्षाने सभागृहात बहुमत सिद्ध करण्यात यश मिळवलं.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018
भाजप 104
काँग्रेस 78
जनता दल (सेक्युलर) 37
बहुजन समाज पार्टी 1
कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1
अपक्ष 1
संबंधित बातम्या :
काँग्रेसच्या 7 लिंगायत आमदारांवर भाजपची मदार
कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स, काँग्रेसकडून 100 रुम बूक
कर्नाटकात भाजपची काल रात्री एक जागा कमी झाली, आज वाढली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement