एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदींमुळे कॅमेरामनचा जीव वाचला!
जामनगर: जामनगर आणि राजकोट दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसंगावधानामुळं आज एका कॅमेरामनचा जीव बचावला आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सौना परिजल योजनेचा उद्घाटन होणार होतं. मोदींनी हिरवा कंदील दाखवताच नर्मदेच्या पात्रातून पाणी थेट सौराष्ट्राकडे धावणार होतं. त्याआधी या सगळ्या वृत्ताचं चित्रीकरण करण्यासाठी दूरदर्शनचे कॅमेरामन संतोष शेजकर नदीपात्रात उतरले.
पाणी सोडण्याच्या आधी काही क्षण कॅमेरामन मोदींच्या नजरेस पडले. यावेळी घाईघाईनं मोदींनी मुख्यमंत्री विजय रुपानींना सांगून त्यांना हटवण्यास सांगितलं आणि कॅमेरामन नदीपात्रातून दूर जाताच काही क्षणात पाण्याचा लोंढा कॅमेऱ्याला येऊन धडकला.
ही सगळी दृश्यं इतर कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. मोदींनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं एक अघटित घटना टळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement